तेजस विमान क्रॅश होण्याची भीती वाटतेय; तृणमूल काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरूमध्ये नुकतेच तेजस विमानाने उड्डाण केले. मोदी यांनी पहिल्यांदाच फायटर विमान तेजसमधून यशस्वी सफर घडवली. यानंतर आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. परंतु या सफरीवर आता तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते शांतनू सेन आणि कुणाल घोष यांनी जोरदार निशाणा साधला आहे. तेजस विमान क्रॅश होण्याची आता भीती वाटत आहे, असे या नेत्यांनी म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसच्या या विधानावर भाजपने पलटवार केला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते शांतनू सेन यांनी म्हटले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांची भेट घेतली त्यानंतर ‘चांद्रयान-2’ मोहीम अयशस्वी झाली. अभिनेत्री कंगना रानौतची भेट घेतली तर तिचा ‘तेजस’ चित्रपट फ्लॉप झाला. क्रिकेटपटू विराट कोहलीने पंतप्रधानांशी हस्तांदोलन केले, तर विराटला लागोपाठ तीन वर्षांपर्यंत शतक झळकावता आले नाही. विश्वचषक सामन्यात लागोपाठ दहा सामने जिंकणारा टीम इंडिया संघ फायनलच्या सामन्यात पराभूत झाला. कारण आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी उपस्थित होते.