Lok Sabha Election 2024 – शिवसेनेतर्फे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिरज येथील जनसंवाद सभेत भाजप आणि मिध्यांचा समाचार घेतला. त्यावेळी सांगलीतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांचं नाव घोषित केलं.

नाव घोषित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी माणूस बघून जबाबदारी देतो. माझी खात्री आहे की, जो माणूस मातीत कुस्ती खेळून जिंकतो, तो मातीशी इमानच राखेल, मातीशी कधीच बेईमानी करणार नाही. आज मी चंद्रहारची उमेदवारी जाहीर करतोय, शिवसेनेच्या मशालीवर चंद्रहार तिथे निवडून जाणार आहे. हा मर्द तुमच्यासाठी उतरला आहे, पण याला जिंकवून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल. सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्हीही मर्द आहोत. या चंद्रहारची गदा तुम्ही आहात. चंद्रहार तुझी अस्सल गदा समोर आहे, ती जोवर तुझ्यासोबत आहे, तोवर कशाचीही चिंता करू नको, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.