तरुण बेरोजगार, शेतकरी त्रस्त, महागाईने जनता बेहाल; सपाच्या डिंपल यादव यांचा भाजपवर हल्लाबोल

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि मैनपुरीच्या उमेदवार डिंपल यादव यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. प्रदेशातील तरुण बेरोजगार आहे आणि शेतकरी त्रस्त आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या पिकांवर किमान हमीभाव देण्याची मागणी पूर्ण करू शकले नाही. शेतकऱ्यांनी आंदोलन केले, तेव्हा सरकारने दिल्ली-गाझीपूर सीमेचे छावणीत रूपांतर केले अशी टिका डिंपल यादव यांनी यावेळी केली.

डिंपल यादव म्हणाल्या, देशात दबावाचे राजकारण सुरू आहे. सैनिकांसाठी एक पद-एक निवृत्तिवेतन (वन रॅंक वन पेन्शन) हेही खोटं आहे. डिंपल यादव म्हणाल्या की, अग्निवीरसारख्या योजना आणून देशातील संरक्षणक्षेत्र कमकुवत करण्यात आले आणि सैनिकांचा सन्मान ठेवण्यात आला नाही. जी लोकं जवानांचा सन्मान करू शकले नाहीत त्यांनी देश चालवायची भाषा करू नये, असेही यादव म्हणाल्या.

भाजपवर हल्लाबोल करताना डिंपल यादव म्हणाल्या की, ही लोकं कायम खोटं बोलत राहणार, आता लोकांनाही कळलेय खोटी आश्वासने देणाऱ्या सरकारला आता हटवायचे आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाण्याबाबत त्या म्हणाल्या, मला समजतयं सगळं, राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला ना मला ना अखिलेश यादव यांनी काही आमंत्रण आले होते. अशा प्रकारचे मुद्दे काढून जनतेने लक्ष विचलित करण्याचे काम भाजपकडून सुरु आहे जेव्हा प्रभू श्री राम आम्हाला बोलावतील त्यावेळी आम्ही अयोद्धेला नक्की जाऊ, तेथेच काय आम्ही वृदांवन, बद्रीनाथ, केदारनाथ, जगन्नाथ पुरी, द्वारका या प्रत्येक धार्मिक स्थळाला जाऊ असेही त्या म्हणाल्या.