फिटनेसला बेंचमार्क करण्यात विराट पुढे

हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये फिटनेसचा बेंचमार्क स्थापित करण्यात विराट कोहलीच सर्वात पुढे आहे. फिटनेसला प्राधान्य दिल्यामुळे संघातील अन्य खेळाडूंनाही फिटनेसची ओढ लागली. गेल्या दहा वर्षांत फिटनेसचा दर्जा बदलला आहे. आपल्या इथे गुणवत्तेची कमतरता नाही. विराटने फिटनेसचा बेंचमार्क सेट करू सारे चित्रच बदलले आहे. तो तर गेल्या 15 वर्षांच्या कारकीर्दीत आता सर्वात फिट असल्याचे सांगत निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी टी-20 वर्ल्ड कपचा हिंदुस्थानी संघ विराटशिवाय नसणार असेही संकेतही दिले आहेत. तसेच आयपीएल हा एक मोठा मंच आहे आणि इथे जो खेळतो तो जगासमोर येतो. या स्पर्धेतून अचानक अद्भुत प्रतिभेचा खेळाडू समोर येतो आणि त्याची दखलही सर्वांना घ्यावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.