‘प्रॉस्टिटय़ूट-मिस्ट्रेस’सारख्या  शब्दांचा कोर्टात वापर नको! सर्वोच्च न्यायालयाकडून नवीन शब्दावली जारी

हे पाच न्यायमूर्ती सध्या काय करतात याबाबत अनेकांना माहिती नाहीये. या पाचपैकी 4 न्यायमूर्ती हे आता निवृत्त झाले असून यातले एक न्यायमूर्ती हे सर्वोच्च न्यायालयात आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात आणि युक्तिवादात आता जेंडर स्टीरिओटाइप शब्दांचा वापर केला जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने महिलांसाठी वापरल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह शब्दांवर बंदी घालण्यासाठी जेंडर स्टीरिओटाइप कॉम्बॅक्ट हॅण्डबुक लाँच केले आहे.

जागतिक महिला दिनी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या कार्यक्रमात कायदा प्रकरणात महिलांसाठी आक्षेपार्ह शब्दांचा वापर रोखला जाईल,  एक नवीन शब्दावली जारी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. बुधवारी या शब्दांचे हॅण्डबुक जारी केले. या हॅण्डबुकमुळे कोणता शब्द रूढीवादी आहे, कोणता शब्द उच्चारण्यापासून दूर रहावे, हे  समजू शकेल, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

जेंडर स्टीरिओटाइप कॉम्बॅक्ट हॅण्डबुकमध्ये काय आहे

या हॅण्डबुकमध्ये आक्षेपार्ह शब्दांची यादी आहे. हे हँडबुक वकिलांसोबत न्यायाधीशांसाठीसुद्धा आहे. हे हॅण्डबुक तयार करण्याचा उद्देश स्पष्ट आहे. कोणत्याही निर्णयावर टीका किंवा संशय घेणे नाही. चुकून रूढीवादी परंपरा सुरू आहे. रूढीवादी परंपरा काय आहे, त्यामुळे काय नुकसान होत आहे हे न्यायालयाने सांगणे गरजेचे आहे, असे सरन्यायाधीश म्हणाले.

आधीचे शब्द आणि रिप्लेसमेंट

  • मिस्ट्रेसः विवाह न करता रोमँटिक अथवा लैंगिक संबंध बनवणे
  • अफेयरः विवाहव्यतिरिक्त अन्य संबंध
  • प्रॉस्टिटय़ूटः सेक्स वर्कर
  • अनवेड मदरः आई
  • हाऊसवाईफः होम मेकर
  • चाइल्ड प्रॉस्टिटय़ूटः तस्करी करून आणलेले मूल
  • बास्टर्डः विवाह न झालेल्या आई-वडिलांचे मूल
  • ईव टीजिंगः स्ट्रीट सेक्शुअल हॅरेसमेंट
  • प्रोवोकेटिव क्लोदिंगः क्लोदिंग/ड्रेस

गुड वाइफः पत्नी

रखेलः अन्य पुरुषाशी महिलेचे शारीरिक संबंध