जगाच्या पाठीवर – जगातील पहिली फुटबॉल टीम

>>तुषार करमरकर

फुटबॉल हा खेळ इसवी सनापूर्वी 206 ते 220 यादरम्यान चीनमध्ये खेळला जात असे. त्या वेळी हा खेळ ‘कुजू’ या नावाने ओळखला जात असे. ‘कुजू’ या चिनी शब्दाचा अर्थ ‘पायाने मारा बाल’ असा होतो. हा खेळ चीनमधून इंग्लंडमध्ये गेला. एबेन्झर मोर्ली याने पहिला फुटबाल क्लब काढला. फुटबालचे नियम बनविण्यासाठी त्याने 26 आाक्टोबर 1863 मध्ये लंडनमध्ये एक मीटिंग घेतली. फुटबाल हा खेळ जगभर फिफा या संस्थेने नेला. फिफाची स्थापना 21 मे 1904 मध्ये झाली. त्याअगोदर 41 वर्षे ‘फा’ ही फुटबालची संस्था होती.

अशा पद्धतीचा खेळ प्राचीन ग्रीसमध्येही खेळला जात असे. तिथे त्या खेळाला ‘इपिस्किरोस’ असे म्हणत. या शब्दाचा अर्थ ‘एकच बाल’ असा होतो.

‘फुटबाल’ हे नाव 1409 मध्ये राजकुमार चौथ्या हेन्रीने दिले. या हेन्रीने 1526 मध्ये खेळण्यासाठी खास बूट बनवून घेतले. शिफिल्ड एफ.सी. हा जगातील सगळय़ात जुना फुटबाल क्लब आहे. फुटबाल असोसिएशनशी 1863 मध्ये हा क्लब संलग्न झाला.