उत्तराखंड, उत्तर प्रदेश अॅलर्टमोडवर; हल्दवानी दंगलीत 2 ठार, शाळा- इंटरनेट बंद

riot-uttarakhand

उत्तराखंडच्या हल्दवानी येथे गुरुवारी झालेल्या हिंसाचारात दोन जण ठार झाले. अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांना संशय आहे की दंगली पूर्व नियोजित होत्या. याआधी बनभूलपुरा येथील ‘बेकायदेशीरपणे बांधलेला’ मदरसा आणि शेजारील मशिदी पाडल्याबद्दल रहिवाशांनी वाहने आणि पोलीस स्टेशनला आग लावल्यानंतर आणि दगडफेक केल्यावर अधिकाऱ्यांनी कर्फ्यू लागू केला.

उत्तराखंडमधील हल्दवानी येथे गुरुवारी बेकायदेशीर मदरसा आणि शेजारील मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाला आणि जवळापास 250 जखमी झाले. दंगलखोरांविरुद्ध शूट-एट-साइट आदेश जारी करून आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस कर्मचाऱ्यांसह सरकारी अधिकाऱ्यांच्या पथकाने संरचना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा संघर्ष उफाळला.
प्रशासनाने मदरसा आणि मशीद बेकायदेशीर घोषित केल्यामुळे ते पाडण्यात आले. मात्र, या कारवाईला हल्द्वानीच्या वनभुलपुरा भागातील रहिवाशांचा तीव्र विरोध झाला. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मृतांची संख्या दोन असल्याची माहिती दिली.

या दंगलीत 50 हून अधिक पोलिस जखमी झाले, अनेक प्रशासन अधिकारी, पालिका कर्मचारी आणि पत्रकारही गोळीबारात अडकले. दंगलखोरांनी अधिकाऱ्यांवर दगडफेक केली त्यामुळे पोलिसांना अश्रूधुराच्या कांड्या फोडावा लागल्या. जमावानं पोलीस ठाण्याबाहेरील वाहने पेटवली.

मदरसा आणि मशिदीने कथितरित्या अतिक्रमण केलेली सरकारी जमीन साफ करण्याच्या उद्देशाने, पोलीस आणि प्रांतीय सशस्त्र कॉन्स्टेब्युलरी (PAC) उपस्थितीसह पाडण्यात आले. न्यायालयाच्या आदेशाचे पालन केल्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रल्हाद मीना यांनी सांगितले.

बुलडोझरने बांधकामे जमीनदोस्त केल्यानंतर संतप्त झालेला जमाव रस्त्यावर उतरला. त्यांनी बॅरिकेड्स तोडून पोलिसांवर हल्ला केल्यानं परिस्थिती चिघळली. त्यानंतर जमावाने पोलीस, पालिका कर्मचारी आणि पत्रकारांवर दगडफेक केली, परिणामी अनेकजण जखमी झाले आणि मालमत्तेचेही नुकसान झाले. 20 हून अधिक मोटारसायकल आणि एक सुरक्षा बस जाळण्यात आली.