संगमनेरमधून बेपत्ता 94 जणांचा अद्यापि तपास नाही, पोलीस तपासाबाबत नागरिकांमध्ये शंका

संगमनेर शहर आणि परिसरातून गेल्या आर्थिक वर्षात 86 पुरुष, 130 स्त्र्ाया, एक लहान मुलगा आणि चार मुली बेपत्ता झाल्याच्या नोंदी आहेत. यापैकी 39 पुरुष, 50 स्त्र्ाया, एक लहान मुलगा आणि चार मुलींचा तपास अद्यापि लागलेला नसून, हे सर्वजण आजही बेपत्ता आहेत. या बेपत्ता झालेल्यांचे रहस्य आजही कायम असून, पोलीस तपासाबाबत नागरिकांमधून शंका व्यक्त केली जात आहे.

हरवलेल्या मुलांचा, मुलींचा, स्त्र्ाया आणि पुरुषांच्या शोधाची समस्या नेहमीच असते. काही लोक घर सोडून पळालेले असतात. काही तरुण मुले- मुली लग्न करण्यासाठी घरातून निघून गेलेले असतात. काही स्त्र्ाया घरातून गायब झालेल्या असतात. काहींचा घातपात होण्याची शक्यतादेखील असते. अशा विविध कारणांनी (मिसिंग) हरवलेल्या व्यक्तींची तक्रार कुटुंबीयांच्या वतीने पोलिसांकडे करण्यात येते. संगमनेर शहर पोलीस ठाण्यातदेखील अशा नोंदी करण्यात आल्या आहेत. सन 2023 चे पूर्ण वर्ष ते सन 15 मार्च 2024 पर्यंत संगमनेर शहरातून 86 पुरुष 130 स्त्र्ाया, एक लहान मुलगा आणि चार मुली हरवल्या असल्याच्या नोंदी झाल्या आहेत. यामध्ये अद्यापही 39 पुरुष 50 स्त्र्ाया, एक लहान मुलगा आणि चार मुलींचा तपास अद्यापि लागलेला नसून, हे सर्वजण आजही बेपत्ता आहेत. शहर पोलिसांनी या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी गायब असलेल्या अथवा हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेतला असला, तरी बेपत्ता नागरिकांची संख्या मोठी आहे.

बेपत्ता झालेल्यांच्या माहितीमध्ये फक्त स्त्र्ााr, पुरुष मुले आणि मुली अशी जुजबी माहिती असल्याने त्यांच्या वयाचा विचार करण्यात आलेला नाही. यामध्ये तरुणांची आणि तरुणींची संख्या जर जास्त असेल तर तो चिंताजनक विषय आहे. लहान मुलांचासुद्धा चिंताजनक विषय आहे. देशात घडणाऱया विविध घटना, लहान बेपत्ता मुला-मुलींचा होणारा गैरवापर तसेच तरुण स्त्र्ााr- पुरुषांचा होणारा गैरवापर हा सर्वश्रुत आहे. काही स्त्र्ायांना व पुरुषांना ब्रेन वॉश करून समाजविघातक कृत्यांसाठीसुद्धा तयार केले जात असल्याच्या घटना यापूर्वी देशात उघडकीस आलेल्या आहेत.

संगमनेर शहरात सन 2023 पासून आजपर्यंत 39 पुरुष, 50 स्त्र्ाया आणि चार मुली व एक लहान मुलगा असे अद्यापही बेपत्ता आहेत. त्यामुळे संपूर्ण संगमनेर तालुका आणि संपूर्ण संगमनेर उपविभागातून बेपत्ता होणाऱयांची संख्या मोठी असण्याची दाट शक्यता आहे.