आरक्षणाचा विषय आला की अजित पवार आजारी पडतात; पल्लवी जरांगे यांची टीका

मराठा आरक्षणाचा विषय काढला की, उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी पडतात, अशी टीका मनोज जरांगे यांची मुलगी पल्लवी जरांगे हिने केली. ते आंतरवाली सराटीत येणार होते, पण ते आजारी पडले. बाकीच्या कार्यक्रमांना मात्र ते कसे जातात, असा सवालही तिने केला आहे.

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्या कुटुंबाची घालमेल वाढली आहे का? असा सवाल विचारला असता पल्लवी म्हणाली, ‘होय, आमच्या कुटुंबाची खूप घालमेल वाढली आहे. कारण पप्पांनी उपोषण करावे, अशी त्यांची अवस्था नाही आहे. मागच्या वेळी डॉक्टरांनी सांगितले होते की, त्यांनी उपोषण करू नये, पण सरकारला उपोषणाशिवाय जागच येत नाही. त्यामुळे दु:ख होतंय आणि पप्पांना असे उपोषण करावे लागतेय, असे पल्लवी जरांगे म्हणाली. दोन महिने झाले ते घरी नाहीत, सरकार कधी चर्चेला येणार. पप्पा आमचा फोनही उचलत नाही. ते भावनिक होतील आणि त्यांच्या उपोषणावर परिणाम होईल म्हणून आम्ही भेटायलाही जात नाही, असे प्रणाली मनोज जरांगे पाटील म्हणाली.