डीपीएन-पीएचएन सीईटी नोंदणी सुरू

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्षे 2024-25करिता पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहेत. एमएच-डीपीएन/पीएचएन सीईटी-2024 प्रवेश परीक्षेसाठी 16 एप्रिलपासून अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे.

शैक्षणिक वर्ष 2024-25साठी शुश्रृषा संवर्गाशी संबंधित मनोरुग्ण तज्ञ परिचारिका (डी.पी.एन.) व सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पी.एच.एन.) या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएच-डीपीएन/पीएचएन सीईटी – 2024 प्रवेश परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणार आहे. त्यासाठी 16 एप्रिलपासून अर्ज नोंदणीसाठी सुरुवात झाली आहे.

डीपीएन हा एक-दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे जो मानसिक आजार असलेल्या रुग्णांना काळजी आणि मदत देण्यासाठी नर्सना प्रशिक्षण देतो. या अभ्यासक्रमात मानसिक आजारांचे स्वरूप, कारणे, लक्षणे आणि उपचार यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना औषधोपचार, थेरपी आणि काउन्सेलिंग यांसारख्या मानसिक आजारांवर उपचार कसे करावे हे या अभ्यासक्रमातून शिकवले जाते. तर पीएचएन हा एक-दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे जो समुदायातील लोकांना आरोग्य आणि स्वच्छता याबाबत शिक्षण आणि मार्गदर्शन देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येते.

इच्छुक उमेदवार सीईटी सेलचे अधिकृत संकेतस्थळ www.mahacet.orgवर आपला अर्ज भरू शकतात. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 एप्रिल रात्री 11ः59 वाजेपर्यंत देण्यात आली आहे.