परीक्षण – ‘भक्ती’चा ठेवा

> निलय वैद्य

12 फेब्रुवारी 2001 रोजी संकष्टीच्या दिवशी सर्वांची लाडकी भक्ती बर्वे हिचं अपघाती निधन झालं. 31 मराठी नाटकं, 6 हिंदी नाटकं, 3 गुजराती नाटकं इतका विपुल ठेवा मागे ठेवून भक्ती देवा घरी गेली. हे अकाली जाणं प्रत्येक नाट्यप्रेमी माणसाला चटका लावून गेलं. हा चटका साधा सुधा नव्हता. भक्तीच्या निधनाची आठवण झाली की, आजही ज्यांनी तिचा अभिनय पाहिलाय, अनुभवलाय ते हळहळतात.

नाट्य व्यवसायात भक्ती सक्रिय असताना एका लोकप्रिय साप्ताहिकात स्तंभलेखन करायची. तिने स्तंभलेखन करावं ही नाट्य समीक्षक अरुण घाडीगावकर यांची इच्छा होती. त्यांनी भक्तीकडे हा प्रस्ताव ठेवला. अरुण घाडीगावकर यांना भक्तीला लिहितं करायला बऱ्याच वहाणा झिजवायला लागल्या. भक्ती हट्टी होती. ती स्तंभलेखनाला ‘हो’ म्हणेना आणि ‘नाही’ही म्हणेना. शेवटी घाडीगावकर यांनी शफी इनामदारांनामध्ये घेतलं आणि भक्ती लिहिती झाली. त्याचं श्रेय घाडीगावकर यांचं!

भक्ती बर्वे लिखित आणि अरुण घाडीगावकर संपादित ‘भक्ती पंथेचि जा वे’ हे देखणं पुस्तक ग्रंथालीने नुकतंच प्रकाशित केलंय. यात भक्तीने त्या साप्ताहिकासाठी लिहिलेल्या स्तंभाचा समावेश आहे. यात सर्व मिळून 26 लेख आहेत. ‘माणिकमोतीच्या निमित्ताने’, ‘हृदया ला भिडलेले सुधीर-गोपाळ’, ‘आकाशवाणी-दूरदूदर्शन’, ‘रसिक राजा’, ‘बालरंगभूमीच्या प्रणेत्या सुधा करमरकर’, ‘नाटकाचं माहेर(घर)’, ‘सांगली आणि मी’, ‘शुभेच्छा शफी शिवाय’, ‘आठवणींच्या पसाऱ्यातून’, ‘आदरांजली-श्रद्धांजली’…अशी त्या स्तंभांची वैशिष्ट्यपूर्ण नावं आहेत. ही शीर्षके वाचून या पुस्तका विषयी जिज्ञासा नाही निर्माण झाली तर नवल!

घाडीगावकर यांनी या लेखनप्रपंचासाठी काय काय केलं, ही एक मोठी कथाच म्हणायला हवी. ती घाडीगावकर यांनी
दीर्घ स्वरूपात पुस्तकाच्या सुरुवातीला सांगितली आहे. या प्रस्तावनेतून घाडीगावकर यांच्या या परिश्रमातून भक्तीच्या स्वभावाचे असंख्य पैलू वाचकांच्या समोर येतात. तिची लोकप्रियता, तिच्या करीअरचा चढता आलेख, अभिनयाचं तारतम्य, तिचे नातेसंबंध, मनाची पारदर्शकता. इतकेच नव्हे तर तिचा हट्टी स्वभाव, इगो, दुरादुराग्रह हे
सारं त्या कथेमध्ये प्रतिबिंबिबिंत होतं.

संपादकाच्या या मनोगताचं शीर्षक आहे, ‘अरुण, तुला शिकवीन चांगलाच धडा.’ या शीर्षकातून वाचकांना काय तो सुगावा लागतो. पुढे घाडीगावकर यांनी पु. ल. आणि भक्ती यांची आदरयुक्त मैत्री, ‘फुलराणी’चे अनुभव, शफीशी असलेले नातेसंबंध, त्यापूर्वी असलेली सतीश दुभाषी यांच्याशी मैत्री… हे रेशीम बंध घाडीगावकर यांनी उलगडले आहेत.

भक्ती यांनी लिहिलेला ‘परिसराचं ऋण’ हा लेख मोठा गंमतशीर, वाचनीय आणि माहिती पूर्ण आहे. यात ती राहत असलेल्या गिरगावासह मॉडेल हाऊसचं वर्णन आलं आहे. या मॉडेल हाऊसमध्ये बडी मंडळी वास्तव्यास होती. कामगार नेते एस. एम. जोशी, कॉंग्रेसच्या जया राव, ‘डॉ . कोटणीस की अमर कहानी’चे स्वत डॉ. कोटणीस, ज्ञानेश्वर नाडकर्णी, सुमन कल्याणपूर, गॉसिप क्वीन पत्रकार देवयानी चौबळ, मो. ग. रांगणेकर, डॉ. चंदू वागळे, दा मू केंकरे यांची बहीण … अशा कित्येक दिग्गजांचा पत्ता ‘मॉडेल हाऊस’ हा होता. या सर्वां बरोबर बर्वे परिवाराचा घरोबा होता. तिथे राहणारी स्वत भक्ती एक सुपरहिट सेलिब्रिटी होती. ‘मॉडेल हाऊस’चं भौगोलिक स्थानही वैशिष्ट्यपूर्ण होतं. ग्रँट रोड, केनेडी ब्रिज, ऑपेरा हाऊस या वस्तूंच्यामध्ये ‘मॉडेल हाऊस’ वसलं होतं. शेजारी बॉम्बे संगीत कलाकार मंडळ होतं. अशा बऱ्या वाईट वातावरणात भक्तीचा निवास होता.

अनुक्रमणिकेतले आणखी वैशिष्ट्यपूर्ण लेख सांगायचे झाले, तर ‘शाळेची कवाडं’, ‘सुधा करमरकर’, ‘माझा कैवारी ’,
‘हृदयाला भिडलेले सुधीर-गोपाळ’ हे लेख त्या वेळच्या रंगभूमीचे दाखले देतात. आणखी एक आणि महत्त्वपूर्ण
वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकाचं मुखपृष्ठ. ते केलंय सतीश भावसार यांनी. नाट्यसृष्टीतील एक वादळी आणि आवडतं
व्यक्तिमत्व तिच्या स्तंभलेखनातूनही उमटली. त्यामुळे हे पुस्तक आवर्जून वाचावं असंच आहे.

‘भक्ती’पंथेचि जावे
लेखिका : भक्ती बर्वे-र्वेइना मदा र
संपादन : अरुण घाडीगावकर
प्रका शक : ग्रंथा ली प्रका शन मूल्य : 250 रुपये