पुढचा आठवडा आयपीओचा, गुंतवणूकदारांना मोठी संधी

पुढील आठवडा गुंतवणूकदारांसाठी खास असणार आहे. सोमवारपासून अनेक कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. राशी पेरिफेरल्स कंपनी, कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंपनी, जना स्मॉल फायनान्स बँक, एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेड यांच्यासह अनेक आयपीओ येणार आहेत.

कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक

– कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचा आयपीओ 7 फेब्रुवारीला येत आहे तर 9 फेब्रुवारीला बंद होईल. या आयपीओची प्रतिशेअर किंमत 445 ते 468 रुपये ठरवण्यात आली आहे. गुंतवणूकदार आपली भागीदारीतील 15,61329 इक्विटी शेअर्सची विक्री करणार आहेत. तर आयपीद्वारे 523.07 कोटी जोडण्याची योजना आहे.

जना स्मॉल फायनान्स बँक

– बंगळुरूमधील जना स्मॉल फायनान्सचा आयपीओ 7 फेब्रुवारीला खुला होणार आहे. हा आयपीओ 9 फेब्रुवारीला बंद होणार आहे. प्रतिशेअरची किंमत 393 ते 414 रुपये ठेवली आहे. या आयपीओतून 570 कोटी रुपये जमवण्याचा प्लान आहे.

राशी पेरिफेरल्स

– राशी पेरिफेरल्स कंपनी आपला 600 कोटी रुपयांसाठी आयपीओ आणत आहे. हा आयपीओ 7 फेब्रुवारीला सुरू होऊन 9 फेब्रुवारीला बंद होणार आहे. या आयपीओसाठी प्रतिशेअर किंमत 295 ते 311 रुपये ठेवली आहे.

सोमवारी नवा आयपीओ

– एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेडचा 920 कोटी रुपयांचा आयपीओ 5 फेब्रुवारी 2024 रोजी येत आहे. हा आयपीओ 5 ला खुला होऊन 7 फेब्रुवारीला बंद होईल. आयपीओची प्रतिशेअर किंमत 147 ते 155 रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आली आहे.

बादशाह मसाला कॅम्पेन
– हाऊस ऑफ डाबरची बादशाह मसाला प्रायव्हेट लिमिटेडने ‘स्वाद कन्झ्युमर्स के हाथों का, जादू बादशाह का’ या पश्चिम बाजारपेठेकरिता तयार केलेल्या नवीन कॅम्पेनची घोषणा बादशाह मसाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेहान हसन यांनी केली.

कोटक म्युच्युअल फंड

– कोटक म्युच्युअल फंडने मुंबईमध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) सोबत भागीदारी करून गुंतवणूकदारांचे शिक्षण आणि जागरूकता उपक्रम ‘सीखो पैसा की भाषा’ आयोजित केले आहे.