दखल – हायकूवर नवा प्रकाश

>> एम. के. पवार

महाराष्ट्रात साधारण 2000 सालानंतर अनेक हायकू संग्रह प्रकाशित होताना दिसत आहेत. मराठीतील हायकूच्या उद्गात्या शिरीष पै यांनी अनेक मराठी हायकूकारांच्या पुस्तकांना प्रस्तावना लिहून दिल्या आहेत. तसेच व्यक्तिश अनेकांना हायकू या काव्यप्रकाराविषयी ज्ञान दिले आहे. ‘असा बरसला हायकू’ या पुस्तकाद्वारे मेघना साने यांनी हायकू या विषयावर अधिक प्रकाश पडला आहे. ’1980 नंतरचा मराठी हायकू : स्वरूप आणि चिकित्सा’ हा विषय घेऊन मुंबई विद्यापीठात एम. फिल. करताना त्यांनी हायकूनिर्मिती प्रक्रियेचा सखोल अभ्यास केला आहे आणि आपली निरीक्षणे नोंदवली आहेत.

त्या म्हणतात, ’कवितानिर्मितीची प्रािढया आणि हायकूनिर्मितीची प्रक्रिया ही एकमेकांच्या उलट आहे. हायकू लिहिताना एक निसर्गचित्र समोर असते. त्याकडे पाहून कवीची समाधी लागते. त्यातून कवीला जीवनाचे तत्त्वज्ञान स्फुरते आणि त्यातूनच कलाटणीची तिसरी ओळी सुचते.’

रानातील झाडे निष्पर्ण झाली आहेत. पाऊस नाही, दुष्काळ पडलाय, अशा झाडांची पाने गेली. पण डेरेदार, उंच, भरीव अशी निराळेपण मिरवणारी झाडं निष्पर्ण झाल्यामुळे त्यांचे केवळ सापळेच उरलेत आणि ते एकसारखे दिसताहेत. दुष्काळात गरीब सारी मनुष्ये एकसारखेच गरीब होतात, एका पातळीवर येतात, असा अर्थ निघतो. तर हायकूच्या या ओळी झाडांकडे पाहून सुचलेल्या आहेत. पण अशा ओळी सुचताना निर्मितीची प्रक्रिया अशी होती. दृश्य – समाधी- अनुभूतीला स्पर्श – हायकूतून तत्त्वज्ञान कलाटणीची ओळ.

कवितानिर्मितीच्या प्रािढयेत विचारांचे वादळ किंवा भावनांचे वादळ अन्त स्पर्श असंज्ञ पातळी – प्रतिमांची भाषा असा  असतो. म्हणजेच हायकूनिर्मिती प्रािढयेच्या उलट ही प्रािढया आहे.

 ‘असा बरसला हायकू’ या पुस्तकात वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असे सुमारे अडीचशे हायकू आहेत. वाचकांना ते निश्चितच अंतर्मुख करतील आणि आनंदही देतील.

असा बरसला हायकू – काव्यसंग्रह

प्रकाशन : उद्वेली बुक्स प्रकाशन

पृष्ठसंख्या : 128   किंमत : रु. 225