मिंध्यांची यादी कॉपी पेस्ट… भाजपच्या प्रचारकांची उसनवारी

शिवसेनेशी गद्दारी केल्यामुळे जनतेसमोर कोणत्या तोंडाने जायचे अशा विवंचनेत असलेल्या मिंधे गटाने आता निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रचारक उसने घेतले आहेत. भाजपने आज आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यानंतर तीच यादी मिंधे गटाने कॉपी पेस्ट करून फिरवली.

भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, रामदास आठवले, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, राज्यातील मंत्री अशा 40 जणांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही त्यात आहेत. मिंध्यांची स्टार प्रचारकांची यादीही काही वेगळी नाही. त्यातही पंतप्रधान व केंद्रीय मंत्र्यांसह राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा समावेश आहे. मिंध्यांनी भाजपची यादी कॉपी पेस्ट केली असली तरी त्यांच्याबद्दल लोकांमध्ये असलेला संताप पाहता भाजपचे स्टार प्रचारक मिंध्यांच्या व्यासपीठावर येतील की नाही याबद्दल शंकाच असल्याची चर्चा सुरू झाली आहे.