कवलापुरात अंधश्रद्धेच्या अघोरी घटनेने खळबळ, दर्श अमावास्येला जिवंत बोकड झाडाला उलटे टांगले

आजच्या विज्ञानवादी युगातही अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे अघोरी प्रकार घडत आहेत. असाच एक अघोरी प्रकार सांगली जिह्यातील कवलापूर गावात घडला आहे. दर्श अमावास्येला एक जिवंत बोकड झाडाला उलटे टांगून ठेवल्याचा प्रकार एका जागृत नागरिकाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करून उघडकीस आणला. मात्र, तोपर्यंत या बोकडाने प्राण सोडलेला होता.

सांगली जिह्यातील कवलापूर गावात तासगाव रस्त्याकडेच्या एका लिंबाच्या झाडाला मागच्या आठवडय़ामध्ये झालेल्या दर्श सोमवती अमावास्येदिवशी अज्ञाताने अंधश्रद्धेतून एक जिवंत बोकड आणून त्याचे मागील दोन पाय दोरीने बांधून त्याला झाडाच्या फांदीला उलटे लटकवून ठेवले होते. आठवडाभर ते बोकड त्याच अवस्थेत राहिल्यामुळे त्या बोकडाचा तडफडून मृत्यू झाला. ही घटना कवलापूर येथील जागरूक नागरिक शिवाजीराव पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना कळवली. अंनिसचे कार्यकर्ते डॉ. संजय निटवे, राहुल थोरात, फारुख गवंडी यांनी जाऊन या घटनेची पाहणी केली. तेव्हा तासगाव रोडवरील शेतातील एका लिंबाच्या झाडाला दहा किलो वजनाचे बोकडाचे मागील दोन पाय दोरीने बांधून त्याला उलटे टांगून ठेवले होते. आठवडाभर ते बोकड तसेच राहिल्यामुळे त्याचा तडफडून मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

हा सर्व प्रकार अमावास्येच्या रात्री ज्याप्रकारे केला आहे, यामागे अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धेचा प्रकार दिसून येतो. आजूबाजूच्या शेतकऱयांकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, पाडव्याच्या आदल्या दिवशी असणाऱया सोमवती अमावास्येच्या रात्री एक गाडी रस्त्याकडेला येऊन थांबली होती. त्यातील लोकांनी हा प्रकार केला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. या पूर्वीही कवलापूरमध्ये मागील महिन्यात कवलापूर-रसूलवाडी रोडवर असाच झाडाला बोकड उलटे टांगून अघोरी प्रकार केला गेला होता, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

झाडाला असे उलटे जिवंत बोकड टांगून त्याचा बळी देण्याचा अघोरी प्रकार पहिल्यांदाच आम्ही पाहत आहोत, असे ‘अंनिस’चे कार्यकर्ते राहुल थोरात, फारूक गवंडी यांनी सांगितले. मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार अमावास्येच्या दिवशी असा प्रकार केला जात असावा, असे वाटते. याबाबत ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती दिली. तसेच कवलापूर गावच्या सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, पोलीस पाटील यांनाही कल्पना दिली आहे. परंतु त्यांनाही या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती नव्हती.

निवडणुकीत अंधश्रद्धेचा वापर करणाऱयांवर गुन्हा दाखल करावा

लोकसभा निकडणुकांच्या लढती अटीतटीच्या होतात, त्यामुळे काही उमेदकार हे प्रतिस्पर्धी उमेदकार क मतदारांकर दबाक निर्माण करण्यासाठी अंधश्रद्धेचे प्रकार करतात. लोकसभा निकडणुकीत अंधश्रद्धेचा कापर करून मतदारांच्या मनात दहशत निर्माण करणे हा गुन्हा आहे. तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग आहे, असे अघोरी प्रकार करणाऱयांकर पोलीस प्रशासनाने जादूटोणाकिरोधी कायद्यानुसार कारकाई कराकी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.

निकडणूक काळात ‘अंनिस’कडे अनेक तक्रारी येतात. मतदारांकर दबाक टाकण्यासाठी अंधश्रद्धेचे प्रकार आढळल्यास ‘अंनिस’शी संपर्क कराका, असे आकाहन ‘अंनिस’च्या कतीने डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, कंदना माने, दीपक माने, भगकान रणदिके, शंकर कणसे, हौसेराक धुमाळ, सुकुमार मंडपे, प्रमोदिनी मंडपे यांनी केले आहे.