Live – ईव्हीएमशिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकूच शकत नाही – राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपानंतर आज ऐतिहासिक शिवतीर्थावर इंडिया आघाडीची विराट जाहीर सभा होत आहे. वाचा या विराट सभेचे लाईव्ह अपडेट्स…


– ईव्हीएमशिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकूच शकत नाही – राहुल गांधी

– हिंदुस्थानात इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू व्हायला दहा वर्ष लागतात पण एका लग्नासाठी दहा दिवसात एअऱपोर्ट होतं.

– एक युवा माझ्याकडे आला. जीपवर उडी मारतो. सिक्युरीटी वाले त्याला मारतात. तरीही तो येतो हात पकडतो. डोळ्यात अश्रू आहेत. मी तीन वर्ष झाले. दररोज रनिंग करतोय. सगळ्या प्रकारचा व्यायाम केला. माझ्या हृद्यात देशभक्ती होती. माझी इच्छा होती की लडाखला जाऊन एक दिवस संधी मिळाली तर देशासाठी गोळी खाईन. अग्नीवीर लागू करून माझ्या देशाने मला धोका दिला. सेनाने तुम्हाला धोका नाही दिला. त्याच शक्तीने तुम्हाला धोका दिला. नरेंद्र मोदी एक मास्क आहे. एक मुखवटा आहे. बॉलिवूड अभिनेत्यांना जसा एक रोल दिला आहे. आज हे करायचं आहे, उद्या ते करायचं आहे छप्पन इंचाची छाती नाही तर ही एक पोकळ व्यक्ती आहे – राहुल गांधी

चार हजार, नंतर सहा हजार किलोमीटर चाललो. मी काय पाहिले

– शिवसेना राष्ट्रवादीचे लोकं असेच गेले नाहीत. त्यांचा गळा पकडून त्यांना भाजपकडे नेले आहे.

– याच प्रदेशातील एक वरिष्ठ नेता काँग्रेस पक्ष सोडतात. व माझ्या आईला रडून सांगतात. की मला लाज वाटतेय. माझ्यात यांच्यासोबत लढायची ताकद नाही. म्हणून मी त्यांच्यासोबत जातोय. असे हजारो लोकांना घाबरवले गेले आहेत.

– राजाची आत्मा ईव्हीएममध्ये आहे.

– हिंदू धर्मात शक्ती शब्द आहे. आम्ही एका शक्तीसोबत लढतोय. ती शक्ती काय आहे.

– आम्ही एका व्यक्तीविरोधात, भाजप विरोधात लढत नाही. एका व्यक्तीला चेहरा बनवून वर बसवलं आहे.

– भाजपसोबत लढतोय यावर चर्चा होतेय. आम्ही सर्व एक राजकीय पक्षाविरोधात लढतोय. देश पण हाच विचार करतोय. हे खरं नाही. आम्ही एका पक्षाशी लढत नाही.

– सोशल मीडिया एक रस्ता आहे असं बोलतात. पण आता त्यांच्यावरही कंट्रोल आहे. अमेरिकन कंपन्यांचा दबाव आहे.

जनतेचे जे मुद्दे आहेत. हिंसाचार, महागाई, जवानांचे मुद्दे महिलांचे मुद्दे अग्नीवीरांचे मुद्दे आता मीडियात दिसत नाही. त्यामुळे आम्हाला ही यात्रा करवाी लागली. देशाचे लक्ष पकडण्यासाठी विरोधकांना चार हजार किलोमीटर चालावं लागलं. संपूर्ण विरोधी पक्ष या यात्रेत सहभागी झाले.

आज देशाचे कम्युनिकेशन सिस्टम मीडिया., सोशल मीडिया हा आता देशाच्या हातात नाहीए.

2010, 2014 ला जर मला चार हजार किलोमीटर कन्याकुमारी से कश्मीर चलना पडेगा असे सांगितले असते तर त्यावेळी मी याचा विचाहरही करू शकत नव्हतो.

– राहुल गांधी यांच्या भाषणाला सुरुवात

– गावात गावात ज आणि हुकुमशाही राजवाटीचा अंत करा, उद्धव ठाकरे यांचे आवाहन

तुम्ही कितीही अत्याचार करा तुम्हाल तोडून, मोडून राहिल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहे.

शिवतीर्थावर जेव्हा रणशिंग फुंकलं जातं. हातामध्ये मशाल घेऊन रणशिंग फुकायचं आहे. लोकशाही रक्षणाची आजपासून लढाई सुरू होतेय. – उद्धव ठाकरे
-अबकी बार भाजप तडिपार – उद्धव ठाकरे

तोडा फोडा आणि राज्य करा असा जर इतिहास असेल. जो आपल्यात फूट पाडतोय त्यालाच तोडा फोडा व त्याच्या छाताडावर पाय देऊन राज्य करा.

– कुणीही राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही. हुकुमशाह केवढाही मोठा असला तरी त्याचा अंत होतोच

देश हाच माझा धर्म, देश वाचला तर आम्ही वाचू. आपली ओळख व्यक्तीची ओळख देश असली पाहिजे. देशाची ओळख ही देश नसली पाहिजे. – उद्धव ठाकरे

– रशियात निवडणूका चालल्या आहेत. पुतीनचे विरोधक कुणीच नाही. जे विरोधक होते ते तुरुंगात होते. काहींना तडीपार केले आहे. दाखवतात असं की मी लोकशाही मानतो पण माझ्या समोरच कुणी नाही. तशी परिस्थिती सध्या आपल्या देशात आहे.

– भाजप एक फुगा आहे. त्यात हवा भरण्याचं काम आम्ही केलं होतं. पण आता त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे.

– याच शहरात 1043 मध्ये चलो हिंदुस्थानचा नारा दिला होता. आज जी हुकुमशाहीला तडीपार करण्यासाठी शिवाजी पार्क निवडलं त्यासाठी तुमचं धन्यवाद करतो.

– उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात

– मोदी यांची गॅरंटी हे सध्या ऐकतोय. ही गॅरंटी चालणारी नाही. गॅऱंटी देऊन चुकीचे आश्वासन देऊन आपल्याला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. – शरद पवार

– ज्यांच्याकडे देशाची हुकुमत आहेत. त्यांनी लोकांना अनेक आश्वासनं दिली होती. आपण बघतोय कोणतंही आश्वासन पूर्ण झालं नाही. वादा करतात पण पूर्ण करत नाही त्यांना हटवण्यासाठी आपल्याला पुढे आलं पाहिजे

  • शरद पवार यांच्या भाषणाला सुरुवात

– मी जम्मू कश्मीरमधून येते. तिथे संविधान संपवलं आहे. पर्यटक म्हणून तुम्ही येता तेव्हा तुम्हाला सर्व व्यवस्थित दिसतं पण प्रत्यक्ष खूप वेगळी परिस्थिती आहे. तशी तुमची हालत होऊ नये म्हणून तुमचं मत इंडिया आघाडीला द्या – मेहबुबा मुफ्ती

– इलेक्शन येत आहे. तुमचं मत तुमच्या हातात आहे. एक अशा पंतप्रधान होत्या. ज्यांनी दहा वर्षाची असताना स्वातंत्र्य लढा दिला, देशासाठी स्वत:चं रक्त सांडलं. त्यांना देखील तुम्ही सत्तेतून बाहेर केलं. 2014 ला तुम्ही मोदींना मत दिलं. त्यांनी तुम्हाला अनेक आश्वासनं दिली. 15 लाख देणार होते, नोकऱ्या देणार होते, महिलांना सुरक्षा देणार होते. पण यातलं काहीच दिलं नाही. – मेहबुबा मुफ्ती

– इथे वेगवेगळ्या पक्षाचे धर्माचे लोकं जमले आहेत. हाच हिंदुस्थान आहे. हेच आपलं संविधान सांगते

– गांधी नावाला भाजपचे लोकं खूप घाबरतात.

– मेहबुबा मुफ्ती यांच्या भाषणाला सुरुवात

– ईव्हीएम विरोधात मी 2004 पासून लढतोय. त्याची मशीन अमेरिकेतून येते. त्यातली स्टोरेज चिप इथे वीस तीस रुपयात मिळते. संसदेने ईव्हीएम आणि पेपर ट्रेलच्या काऊंटिंगमध्ये फरक आला तर पेपर ट्रेलचा निकाल मानायचा. त्यासाठी सर्व पक्षांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली पाहिजे व आपली मागणी त्यांच्यासमोर ठेवली पाहिजे. – प्रकाश आंबेडकर

– मोदीजींनी ते नाते निभावले पाहिजे. त्यांनी आपल्या पत्नीला स्वत:सोबत ठेवले पाहिजे. ते हिंदू संस्कृतीच्या बाता करतात पण तिच संस्कृती मानत नाहीत. – प्रकाश आंबेडकर

– मोदीजी म्हणतात देश त्यांचा परिवार आहे. पण त्यांच्या खऱ्या परिवारातील एक महिला त्यांच्यासोबत नाही राहत. – प्रकाश आंबेडकर

– इलेक्ट्रोल बाँड समोर आले आहेत. प्रत्येक चॅनेलवर अमित शहांचं वक्तव्य येत आहे. आम्ही या बाडच्या माध्यमातून आम्ही भ्र्ष्चटाचाराला पळवलं. फ्युचर गेमिंग कंपनीची 2022 चं प्रॉफिल 215 कोटी आहे. त्यांनी इलेक्ट्रॉल बाँड 1 300 कोटींचे कसे घेतले. अमित शहांनी यांचं उत्तर दिलं पाहिजे. – प्रकाश आंबेडकर

– निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पेट्रोल आणि गॅसचे दर कमी केले आहेत. गरिबी दूर करणारे आज कुठे आहेत?

– हिंदुस्थान दिल्लीत बसून दिसत नाही. तो देशभ्रमण केल्याने दिसतो. तो राहुल गांधी यांना दिसला आहे.

– देशाला वाचवण्याचं ध्येय घेऊन पुढे चाललो तरच सगळं काही ठीक होईल.

– इंडिया आघाडीच्या सरकारमध्ये निवडणूक आयोग मुक्तपणे काम करू शकेल. इंडिया आघाडीच्या सरकारमध्ये ईव्हीएम असणार नाही. आम्ही पुन्हा मतपत्रिकेवर मतदान करण्यासाठी आग्रही आहोत.

– ईव्हीएम मशीन चोर आहे. जेव्हा मत द्याल तेव्हा पुन्हा तपासा.

– फारुख अब्दुल्ला यांच्या भाषणाला सुरुवात

– भाजपचा भ्रष्टाचार हा पांढरपेशा भ्रष्टाचार आहे. देशाला भाजपपेक्षा मोठा धोका नाही. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने भाजपविरोधात लढलं पाहिजे – स्टॅलिन

– कन्याकुमारीपासून सुरू झालेली यांची यात्रा ही आता दिल्ली जिंकल्यावरच संपेल – स्टॅलिन

– ही यात्रा एक व्यक्ती किंवा काँग्रेससाठी नव्हती. तर ती इंडिया साठी होती. देशासाठी होती – स्टॅलिन

– तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांच्या भाषणाला सुरुवात.

– राहुल गांधी यांच्याकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन. प्रियंका गांधी यांनी देखील केले अभिवादन. स्मृती स्थळाला मारली प्रदक्षिणा

– उद्धव ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे, चंपई सोरेन, मेहबुबा मुफ्ती, एम.के स्टॅलिन सभास्थळी उपस्थित

– राहुल गांधी शिवतीर्थावर पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून केलं अभिवादन