धावत्या बसमध्ये प्रवाशांच्या किमती ऐवजाची चोरी

बेस्ट बसमध्ये होणाऱया गर्दीचा फायदा उचलत प्रवाशांच्या पर्स अथवा बॅगेतील किमती ऐवज शिताफीने लंपास करणाऱया टोळीचा एक सराईत आरोपी आझाद मैदान पोलिसांच्या हाती लागला आहे. त्या चोराकडून एका गुह्यातील चार लाख 48 हजार किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांनी यश मिळाले आहे.  कुलाबा बस डेपो ते  डी. एन. मार्गावरील पी.के. वाईनसमोरील बस स्टॉपदरम्यान चोरी झाली.  वरिष्ठ निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि लीलाधर पाटील तसेच कटरे, हिरे, पाटील, कीर्तिकर, मुंढे या पथकाने तपास केला.