रविवारी कुठे असेल मेगाब्लॉक? मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी…

मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या लोकल रेल्वे सेवेवर रविवार 7 एप्रिल 2024 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत कोणत्या गाड्या कोणत्या वेळी धावतील याचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील आणि नंतर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील, पुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव दरम्यान मुलुंड व माटुंगा स्थानकांदरम्यान थांबून धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. सकाळी 11.00 ते संध्याकाळी 5.00 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.

डाऊन धीम्या मार्गावरील सेवा –
ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 09.53 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल आसनगाव लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.33 वाजता सुटेल.

अप धीम्या मार्गावरील सेवा –
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही आसनगाव लोकल आहे जी ठाणे येथून सकाळी 10.27 वाजता सुटणार आहे.
ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण लोकल असून ठाणे येथून दुपारी 04.03 वाजता सुटणार आहे.

ट्रान्स हार्बर मार्ग
सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. वाशी/नेरूळ/पनवेलसाठी सकाळी 10.35 ते दुपारी 4.07 वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सकाळी 10.25 ते दुपारी 4.09 वाजेपर्यंत सदर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही पनवेल लोकल आहे जी ठाणे येथून सकाळी 10.35 वाजता सुटणार आहे.
ब्लॉकनंतर पहिली लोकल वाशी लोकल ठाणे येथून दुपारी 4.19 वाजता सुटणार आहे.

अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा

ठाण्यासाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वाशी येथून सकाळी 10.15 वाजता सुटणार आहे.
ठाण्यासाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी 3.53 वाजता सुटणार आहे.