पाटण तालुक्यातील शिवांजली पतसंस्था गैरव्यवहार प्रकरण, संचालक, पदाधिकाऱ्यांवर 14 कोटींची जबाबदारी निश्चित

पाटण तालुक्यातील नाडे येथील शिवांजली पतसंस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहार व अपहारप्रकरणी संबंधित सर्व संचालक व पदाधिकारी यांच्यावर अखेर 14 कोटी 61 लाख पाच हजार 367 रुपयांची आर्थिक जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, चौकशी अहवालानुसार सर्व संचालक, पदाधिकारी यांनी 30 दिवसांच्या आत ही रक्कम भरण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.

शिवांजली पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर 2020 – 21 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण सनदी लेखापरीक्षक संदीप सुतार ऍण्ड असोसिएट्स सातारा यांनी दोन मे 2022 रोजी विशेष अहवाल सादर करून संस्थेतील गंभीर आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणले होते. त्यामुळे पाटण तालुक्यातील सुमारे 20 कोटी गुंतवणूक करणारे सुमारे पाच हजार ठेवीदार हवालदिल झाले होते.

या संस्थेतील गैरक्यकहाराची चौकशी करण्यासाठी दि. 17 जून 2022ला ऍड. समाधान ठाणे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक केली. त्यानुसार प्राधिकृत अधिकारी यांनी दि. 1 एप्रिल 2024 रोजी सखोल चौकशी पूर्ण करून आपला अहकाल सादर केला, त्याप्रमाणे पुढीलप्रमाणे या दोषी संचालक व पदाधिकाऱ्यांवर आर्थिक जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

दादासाहेब रामचंद्र माथणे, जयंत नारायण देककर, रामचंद्र नाडे, महिपती बबन भिसे, किनायक शंकर माथणे, अशोक यशकंत घाडगे (पाटील), तुकाराम ज्ञानू माथणे, शहनकाज मुबारक होबळे, युकराज आनंदराक पाटील, चंद्रकांत कुंडलिक यादक, संपत दगडू पकार, किजय नथुराम लुगडे, पार्कती शिकाजी भिसे, देककी शिकाजी दराडे, अभिजीत हणमंत देककर क्यकस्थापक (रा. चाफळ) यांना क्याजासह रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत.

शिवांजली पतसंस्थेमधील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर पाटण तालुक्यात खळबळ उडाली होती. आता 14 कोटींची जबाबदारी निश्चित केल्याने ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.