T20 World Cup 2024 : या 5 खेळाडूंचा पत्ता कट होणार?; बघा कधी होणार टीम इंडियाची घोषणा

IPL चा 17 वा हंगाम दणक्यात सुरू आहे. मात्र त्याचबरोबर भारतीय संघ व्यवस्थापन T-20 विश्वचषकाच्या तयारीतही आहे. त्यामुळे आयपीएल 2024 मध्ये खेळांडूनी केलेली उत्तम खेळी ही टी-20 विश्वचषकात टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी महत्त्वाची आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांतील कामगिरीमुळे काही खेळाडूंचे नशीब चमकले तर काहींना अजूनही प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियात निवड होण्याच्या त्यांच्या आशा धूसर झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरीस टी- 20 विश्वचषकातील टीम इंडियाच्या खेळाडूंची घोषणा होऊ शकते. टीम इंडियासाठी खेळणारे काही खेळाडू असे आहेत ज्यांची आयपीएल 2024 मधील कामगिरी चांगली नाही. यामुळे त्यांना विश्वचषकापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे. या खेळाडूंमध्ये 5 खेळांडूचा समावेश आहे.

Ishan Kishan: इशान कोणत्याही सामन्यात बाजी पलटवू शकतो. मात्र आयपीएल 2024 मधील त्याच्या कामगिरीत सातत्य दिसून आले नाही. त्याच्या नावावर 6 सामन्यांत फक्त 1 अर्धशतक आहे. तसेच त्याच्या खात्यात 184 धावांची नोंद आहे. ऋषभ पंत दुखापतीनंतर पुन्हा या हंगामात परतला असून तोही फॉर्मात दिसतोय. यामुळे इशान किशनची निवडही होणे अवघड झाले आहे.

Ravichandran Ashwin : आयपीएल 2024 मधील कामगिरीने अश्विनच्या T20 विश्वचषकात खेळण्याच्या आशा धुळीला मिळण्याची चिन्हे आहेत. या हंगामात खेळल्या गेलेल्या 6 सामन्यांमध्ये अश्विनची सरासरी 209 आहे. तसेच त्याच्या नावावर फक्त 1 विकेटची नोंद आहे. मात्र अशा कामगिरीच्या जोरावर अश्विनला टीम इंडियात स्थान मिळवणे कठीण आहे.

Yashasvi Jaiswal: आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी यशस्वी हा संघात निवड होण्याचा प्रबळ दावेदार होता. पण आयपीएल 2024 मधील जयस्वालची कामगिरी पाहून त्याची निवड होणे कठीण आहे. आयपीएल 2024 च्या 7 सामन्यांत जयस्वालच्या नावावर एकही अर्धशतक नाही. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 39 असून त्याच्या नावावर 121 धावा आहेत. त्यामुळे जयस्वालचा मार्गही कठीण आहे.

Shreyas Iyer: KKR चा कर्णधार असलेला श्रेयस अय्यरही आयपीएल 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या 6 सामन्यांमध्ये काही विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याच्या नावावर एकही अर्धशतक नाही. फक्त 140 धावांची नोंद आहे. अय्यरची अशी कामगिरी त्याची निवड न होण्यामागे निश्चितच कारण असू शकते.

Jitesh Sharma : जितेशसारख्या फलंदाजाला भारतीय संघ व्यवस्थापनाने पाठिंबा दिला असाला तरी ऋषभ पंतच्या पुनरागमनानंतर त्याची निवड होणे कठीण झाले आहे. तसेच संजू सॅमसनच्या दमदार कामगिरीने जितेशच्या खेळण्याची शक्यता कमीच आहे. जितेश शर्माने IPL 2024 च्या पहिल्या 6 डावात फक्त 106 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 29 धावा आहे.