नोकरीच्या नावाखाली करायचा फसवणूक  

नोकरीच्या नावाखाली तरुणीला विमानतळ परिसरात बोलावून तिचा मोबाईल आणि पैसे घेऊन पळून गेलेल्याला अखेर विमानतळ पोलिसांनी अटक केली. संदीप जाणवलकर असे त्याचे नाव आहे. सोशल मीडियावर  ओळख झालेल्या मित्राने तरुणीला नोकरीचे आमिष दाखवले. मित्राचा तथाकथित भाऊ बीकेसीत भेटेल आणि नोकरीची माहिती देईल, असे सांगितले. बीकेसीत त्या तरुणाबरोबर धारावीतील तरुणी आंतरदेशीय विमानतळ टर्मिनस येथे आली. विमानतळावर  जाताना मोबाईल आणि सोने घेऊन जाऊ शकत नाही अशी बतावणी केली. तरुणीने मोबाईल आणि सोने दिल्यानंतर तो तरुण गाडी घेऊन पसार झाला.