छत्तीसगडमध्ये कोब्रा कमांडोंसोबत झालेल्या चकमकीत 13 नक्षलवादी ठार, दारूगोळा आणि शस्त्रास्त्रं जप्त

लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षल गुरिल्ला आर्मी आणि कोब्रा कमांडोमध्ये चकमक झाली होती. सुमारे आठ तास चाललेल्या या चकमकीत 13 नक्षलवादी ठार झाले आहेत. यासोबतच या वर्षात बस्तर भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत आतापर्यंत 43 नक्षलवादी ठार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार थांबल्यानंतर घटनास्थळावरून चार नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आणि त्यानंतरच्या शोधात चकमकीच्या ठिकाणी आणखी सहा मृतदेह सापडले. त्यानंतर शोध मोहिमेत आणखी तीन मृतदेह सापडले. या काळात एक लाइट मशीन गन (एलएमजी), एक 303 रायफल, एक 12 बोअर गन, मोठ्या प्रमाणात बॅरल ग्रेनेड लॉन्चर आणि शेल आणि इतर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.