साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 31 मार्च ते शनिवार 6 एप्रिल 2024

>>नीलिमा प्रधान

मेष – तडजोड करावी लागेल

मेषेच्या व्ययेषात शुक्र, मंगळ गुरू त्रिकोणयोग. मनस्ताप, अपमानकारक घटना घडतील. प्रकृतीची काळजी घ्या. आत्मविश्वासाच्या जोरावर, जुन्या अनुभवावर यश खेचता येईल. समतोल राखणे कठीण वाटेल. नोकरी टिकवा. धंद्यात तडजोड करावी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ धोरण ठेवा.

शुभ दिनांक – 2, 3

वृषभ – कामाची प्रशंसा होईल

वृषभेच्या एकादशात शुक्र, सूर्य, चंद्र लाभयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला दगदग, धावपळ वाढेल. चर्चेत तारतम्य ठेवा. नोकरीत सवलत मिळेल. वरिष्ठ कामाची प्रशंसा करतील. धंद्यात वाढ होईल. वसुली शक्य. नवीन परिचय फायदेशीर व उत्साहवर्धक ठरतील. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती कराल. कौतुक होईल. मुद्दा मांडताना संयम ठेवा.

शुभ दिनांक – 3, 4

मिथुन – प्रेरणादायक वातावरण

मिथुनेच्या दशमेषात शुक्र, चंद्र, बुध त्रिकोणयोग. प्रेमाला चालना मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात प्रेरणादायक वातावरण राहील. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. तरीही प्रश्न सोडवता येतील. धंद्यात लाभ वाढेल. खरेदीविक्रीत फायदा होईल. कर्जाचे काम करा. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक कार्याला वेगळे वळण देता येईल.

शुभ दिनांक – 1, 2

कर्क – नवीन परिचय महत्त्वाचा

कर्केच्या भाग्येषात शुक्र, सूर्य, चंद्र लाभयोग. प्रवासात, दौऱयात संताप आवरा. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. नवीन परिचय महत्त्वाचा ठरेल. कलाक्षेत्रात कल्पनाशक्तीला चालना मिळेल. नोकरीत वरिष्ठांना खुश कराल. धंद्यात तापटपणा नको. राजकीय, सामाजिक कार्यात नावलौकिक वाढेल. दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभेल.

शुभ दिनांक – 3, 4

सिंह – प्रकृतीची काळजी घ्या

सिंहेच्या अष्टमेषात शुक्र, चंद्र, बुध लाभयोग. सौम्य धोरण ठेवा. कोणत्याही क्षेत्रात यश खेचता येईल. प्रकृतीची काळजी घ्या. जवळच्या व्यक्तीकडून मनस्ताप होईल. नोकरीत वरिष्ठांना कमी लेखू नका. धंद्यात उग्र धोरण नको. राजकीय, सामाजिक कार्यात कायदा पाळून कोणतेही वर्तन करा. अतिशयोक्ती टाळा. नवीन परिचयावर भाळू नका.

शुभ दिनांक – 1, 2

कन्या – कराराची घाई नको

कन्येच्या सप्तमेषात शुक्र. शुक्र नेपच्युन युती. थट्टामस्करी करताना तारतम्य ठेवा. अपमानकारक वक्तव्य टाळा. नोकरीत वर्चस्व वाढेल. कामाचे कौतुक होईल. धंद्यात लाभ होईल. नवे काम मिळेल. कराराची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. बुद्धिचातुर्याने मत व्यक्त करा. शब्दात अडकू नका. घरगुती कामे करा.

शुभ दिनांक – 3, 4

तुळ – कामाचा व्याप राहील

तुळेच्या षष्ठेशात शुक्र, चंद्र, बुध त्रिकोणयोग. अपमानकारक शब्द ऐकावे लागतील. भावनेच्या भरात कुणालाही आश्वासन देऊ नका. नाते, मैत्री जपा. नोकरीत कामाचा व्याप राहील. धंद्यात व्यवहाराने वागा. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भावनेला महत्त्व नसते. कर्तव्य, तत्परता बाळगा. सहकारी दुरावा दर्शवतील. कायद्याला महत्त्व द्या.

शुभ दिनांक – 1, 2

वृश्चिक – कायद्याच्या कक्षेत रहा

वृश्चिकेच्या पंचमेषात शुक, सूर्य, चंद्र लाभयोग. नवीन परिचय फायदेशीर ठरतील. प्रतिमा उजळेल. कायद्याच्या कक्षेत राहून व्यवहार करा. नोकरीत नवीन बदल शक्य. कामाची प्रशंसा होईल. धंद्यात नवीन धोरण ठरवता येईल. वसुली करा. प्रत्येक दिवस नव्या घटनेचा ठरेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तणाव कमी होईल.

शुभ दिनांक – 2, 3

धनु – अहंकार नको

धनुच्या सुखस्थानात शुक्र, चंद्र, बुध त्रिकोणयोग. कार्याला गती मिळेल. अहंकार नको. भावनेच्या आहारी न जाता प्रश्न सोडवा. नोकरीत वरिष्ठांचा दबाव राहील. धंद्यात आत्मविश्वासाने पुढे जा. वसुली करा. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक कार्यात सर्वानुमते निर्णय घ्या. तुमच्यावर जबाबदारी असेल. कुणालाही दुखवू नका.

शुभ दिनांक – 3, 4

मकर –  नवे परिचय फायदेशीर

मकरेच्या पराक्रमात शुक्र, शुक्र नेपच्युन युती. भावना व कलात्मकता यांचा सुंदर मेळ घालून एखादी साहित्यकृती बनवता येईल. तुमच्या क्षेत्रात पुढे जाल. नोकरीत कठोर बोलणे टाळा. नवे परिचय फायदेशीर ठरतील. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण घटना घडेल. संसारात सुखद समाचार मिळेल.

शुभ दिनांक – 4, 5

कुंभ – प्रवासात सावध रहा

कुंभेच्या धनेषात शुक्र, चंद्र बुध त्रिकोणयोग. सप्ताहाच्या मध्यावर प्रवासात सावध रहा. नोकरीधंद्यात प्रगती होईल. नवीन परिचय प्रेरणादायक ठरेल. कौटुंबिक जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवाल. प्रवासात आनंद घ्याल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भावना व बुद्धिचातुर्य यांचा मेळ घाला. योग्य मुद्दे मांडता येतील. कौतुक, प्रतिष्ठा मिळेल.

शुभ दिनांक – 31, 1

मीन – रागावर नियंत्रण ठेवा

स्वराशीत शुक्र, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. अनेक समस्या, प्रश्न सोडवता येतील. वाहन जपून चालवा. रागावर नियंत्रण ठेवा. कायदा हातात घेऊ नका. नोकरीत चांगला बदल होईल. धंद्यात तर्कटपणा नको. संयम ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ नवी संधी देतील. कुणालाही कमी लेखू नका. भावना अनावर होतील. वाटाघाटीत यश मिळेल.

शुभ दिनांक – 1, 2