कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खुशखबर; मुंबई-कुडाळ दरम्यान 18 अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या

गणपती उत्सव 2023 दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई आणि कुडाळ दरम्यान 18 अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या चालवणार आहे. यापूर्वी मुंबई विभागाने सप्टेंबर 2023 च्या गणपती उत्सवासाठी 208 विशेष रेल्वे सेवा जाहीर केल्या आहेत. पश्चिम रेल्वेने 2023 च्या गणपती उत्सवासाठी 40 विशेष रेल्वे सेवा जाहीर केल्या आहेत. तसेच मुंबई- कुडाळ दरम्यान 18 अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. आता एकूण सेवा 266 असतील. त्यामुळे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खुषखबर मिळाली आहे.

मुंबई-कुडाळ गणपती स्पेशल

01185 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोमवार, बुधवार आणि शनिवारी 13.09.2023 ते 02.10.2023 या कालावधीत 00.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 11.30 वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
01186 स्पेशल कुडाळहून येथून मंगळवार, गुरुवार आणि रविवारी 13.09.2023 ते 02.10.2023 या कालावधीत 12.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 00.35 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

या गाडीत ठाणे, पनवेल, रोहा, मंगोवन, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजपूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग येथे थांबे असतील. या गाडीत 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 24 सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.