कुडाळ तालुक्यातील 20 पोलीस पाटील व 18 कोतवाल रिक्त पदे भरणार; तहसीलदार अमोल पाठक यांची माहिती

kudal-railway-station

कुडाळ तालुक्यातील पोलीस पाटील पदे 20 व कोतवाल 18 रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. यासाठीची प्रकिया प्रांत अधिकारी कार्यालय व कुडाळ तहसीलदार यांच्या मार्फत सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत या पद भरतीसाठी आरक्षण प्रकिया चालू असून पुढील प्रक्रिया लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी दिली आहे.

कुडाळ तालुक्यातील 77 पैकी 20 पोलीस पाटील पदे रिक्त झाली आहेत. यामध्ये पांग्रड (मयत),आवळेगांव (राजीनामा), निरूखे व झाराप ( सेवानिवृत्त ), सोनवडे तर्फ हवेली (मयत), केरवडे तर्फ माणगाव ,व पिंगुळी सेवानिवृत्त, कांदुळी, बांव, चाफेली या तीन गावात उमेदवार प्राप्त नाही. मोरे, नेरूर तर्फ नारूर, वालावल (राजीनामा) व गोठोस, माणगांव , कुसबे, भरणी, कुपवडे, साळगांव, बांबुळी तर्फ हवेली येथील पोलीस पाटील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झाले होते.तर कोतवाल पदे 18 रिक्त असून यामध्ये कुडाळ, मडगाव, नेरूर तर्फ हवेली, घोटगे, वालावल, माणगाव, वसोली, पडवे, झाराप, बांबर्डे तर्फ कळसुली, बांव, नेरूर कर्याद नारूर, हिर्लोक, गोठोस, जांभवडे, पाट , तुळसुली तर्फ माणगाव व बिबवणे या गावांचा समावेश आहे.

या पद भरतीसाठी आता आरक्षण प्रकिया सुरू करण्यात आली आहे. यानुसार 25 जुलै रोजी सर्व तलाठी, ग्रामपंचायत व तहसीलदार कार्यालय येथे लोकसंख्या तपशिल प्रसिद्ध करण्यात आला. यानंतर 25 ते 27 जुलैपर्यंत लोकसंख्येवर कोणाचे आक्षेप असल्यास ते लेखी स्वरूपात कुडाळ तहसीलदार येथे स्विकारण्यात आले. 31 जुलैपर्यंत लेखी हरकतींवर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच आरक्षण व पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्या त्या गावातील लोकसंख्येनुसार आरक्षण घोषित करण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यात ही प्रक्रिया टप्प्या टप्प्याने पुर्ण करुन ही पदभरती करण्यात येणार आहे अशी माहिती कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी दिली आहे.