केईएमच्या खिडकीतून बाळाला फेकणाऱ्या निर्दयी मातेला जामीन

13 वर्षांपूर्वी केईएम रुग्णालयाच्या बाथरूमच्या खिडकीतून आपल्या दीड महिन्याच्या मुलीला फेकून दिल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या निर्दयी मातेला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. आरोपी दीपिका परमार हिला सत्र न्यायालयाने गेल्या वर्षी जन्मठेप ठोठावली. त्या शिक्षेला तिने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्या अपिलावर अंतिम निर्णय लागेपर्यंत तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

आरोपी दीपिका परमार हिने 2010 मध्ये मुलगा आणि मुलगी अशा जुळय़ा मुलांना जन्म दिला होता, मात्र त्यातील फक्त मुलाचा सांभाळ करण्याचे ठरवत दीपिकाने दीड महिन्याच्या मुलीला केईएम रुग्णालयाच्या बाथरूमच्या खिडकीतून खाली फेकून दिले होते. 26 ऑक्टोबर 2010 रोजी ही धक्कादायक घटना घडली होती.