आदित्य ठाकरे यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र देऊन 300 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 300 गुणवंत विद्यार्थ्यांना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र त्याचबरोबर लॅपटॉप, बॅग आणि पार्कर पेन देऊन सत्कार करण्यात आला. शिवसेना-युवासेना शाखा क्रमांक 192 आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव-खासदार अनिल देसाई यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून भविष्यातील शैक्षणिक वाटचालींसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख तसेच महाराष्ट्रातील असंख्य युवांचे प्रेरणास्थान असलेले आदित्य ठाकरे यांनी नेहमीच शिक्षण आणि पर्यावरणाला केंद्रस्थानी ठेवून भूमिका मांडली आहे. महापालिकेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण त्याचबरोबर हवामान बदलाची समस्या लक्षात घेऊन मुंबईत मियावाकी शहरी वन क्षेत्र निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी स्वाक्षरी केलेले गौरवपत्र, कॉलेज बॅग, पार्कर पेन देऊन 300 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर दहावी-बारावीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप देऊन गौरवण्यात आले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, स्थानीय लोकाधिकार समितीचे संघटन सचिव दिनेश बोभाटे, विभागप्रमुख महेश सावंत, विभाग संघटिका श्रद्धा जाधव, विधानसभा संघटिका आरती किनरे, उपविभाग संघटक सूर्यकांत बिर्जे, उपविभागप्रमुख यशवंत विचले, उपविभाग संघटिका रेखा देवकर, विधानसभा समन्वयक माधवी सावंत, शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे, संजय भगत, शैलेश माळी, शाखा संघटक रिमा पारकर, शाखा समन्वयक रवी पडयाची, शाखा समन्वयक कल्पना पालयेकर, युवा विभाग अधिकारी स्वप्नील सूर्यवंशी, युवती विभाग अधिकारी अॅड. गुरशीनकौर सहानी, युवा शाखा अधिकारी रोहित जाधव, युवा शाखा समन्वयक सुशांत गोजारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.