‘ चला जाणुया नदीला’ उपक्रमाचे स्वप्न धुसर , उमा नदीचा कायापालट फक्त कागदावरच

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने चला जाणुया नदीला या अभियानाची घोषणा करण्यात आली. राज्यातील या अभियानासाठी 103 नद्यांची निवड‌ करण्यात आली होती. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील उमा व इरई ह्या दोन नद्यांची निवड करण्यात आली. उमा नदीचे खोलीकरण, गाळ उपसा , प्रदूषण मुक्त करुन उमा नदी बारमाही कशी वाहणार याची उपाययोजना करुन अमृतवाहिनी करण्याचे ठरले. पण आता अनेक महिने लोटुन सुद्धा उमा नदीला अमृत वाहिनी करण्याचे स्वप्न भंगण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने पर्यावर प्रेमींनी नाराजी व्यक्त केली. या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर कमेटी गठीत करण्यात आली. पण गावोगावी जाऊन फक्त फोटो काढून जनजागृती करण्यावरच फक्त भर देण्यात आला त्यामुळे “चला जाणुया नदीला “ह्या योजनेचा फज्जा उडाला असल्याचे पर्यावरण प्रेमिनी प्रशासनावर रोश व्यक्त केला.