मुस्लिमांना दाढी वाढवून… बुरखा घालून ट्रेनमधून प्रवास करणेही गुन्हा झालाय, अबू आझमी किंचाळले…

औरंगजेबाचे स्टेटस लावण्याच्या मुद्दय़ावरून मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर आज विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि भाजप आमदारांमध्ये खडाजंगी झाली. आझमी यावेळी अक्षरशः सभागृहात किंचाळले. माझा मुस्लिम समाज आक्रोश करतोय. घाबरलाय. दाढी वाढवून…बुरखा घालून ट्रेनमधून प्रवास करणेही गुन्हा झालाय, कोण कधी मारेल याचा नेम नाही, पण कुणीही मदत करायला तयार नाही, असे आझमी यांनी घसा फोडून सभागृहाला सांगितले.

या लक्षवेधी सूचनेवर बोलताना अबू आझमी म्हणाले की, ‘काही मुस्लिम युवकांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यामुळे त्यांच्यावर लगेच गुन्हे दाखल केले. पण औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.’

‘जयपूर-मुंबई एक्प्रेसमध्ये निष्पाप मुस्लिम प्रवाशांची हत्या करण्यात आल्याने मुस्लिम समाजामध्ये घबराट पसरली आहे. माझा मुस्लिम समाज आक्रोश करतोय, पण सरकारकडून मुस्लीम समुदायाला बदनाम करण्याचेच काम सुरू आहे,’ असा आरोप अबू आझमी यांनी केला.

‘सत्ताधारी पक्षातील लोक मला गद्दार म्हणतात. पण देशात नथुराम गोडसेचा फोटो लावला जातो. महात्मा गांधींच्या मारेकऱयांचा प्रचार केला जाऊ शकतो. हे सर्व जाणूनबुजून केले जात आहे. देशाचे वातावरण खराब केले जात आहे,’ असा आरोपही अबू आझमी यांनी केला. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘प्रकाश आंबेडकर हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबादच्या निजामाने बाबासाहेब आंबेडकरांना आमिषे दाखवली होती. तेव्हा आंबेडकरांनी या भूमीतला जो धर्म आहे तोच मी स्वीकारेन, असे सांगितले होते. औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन त्याचे महिमामंडन करू नका, असे आवाहनही आपण प्रकाश आंबेडकर यांना केले होते. औरंगजेबाच्या कबरीवर जाणे हा गुन्हा नाही, तर दोन धर्मांत तेढ निर्माण करणे हा गुन्हा आहे. औरंगजेबाचा स्टेटस ठेवून हाच तुमचा बाप आहे, असे लिहिणे हा गुन्हा आहे.’

महिला अत्याचारात महाराष्ट्र देशात बारावा

महिला अत्याचारांच्या बाबतीत महाराष्ट्र देशामध्ये बाराव्या क्रमांकावर असून बालकांवरील लैंगिक अत्याचारांच्या बाबतीत सतरावा क्रमांक लागतो, अशी माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची संख्या वाढवण्यात येत असून 18 हजार नव्या पोलिसांची भरती केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

विधानसभेत सत्ताधारी पक्षाने उपस्थित केलेली अल्पकालीन चर्चा आणि विरोधी पक्षांनी नियम 293 अंतर्गत केलेल्या चर्चेला फडणवीसांनी बुधवारी विधानसभेत एकत्रित उत्तर दिले. महिला बेपत्ता होत असल्याचा मुद्दा अनेक सदस्यांनी मांडला. पण त्या परत येण्याचे प्रमाणही राज्यात 90 टक्के असल्याचा दावा फडणवीस यांनी केला.

‘शक्ती’ कायदा केंद्राकडे प्रलंबित आहे. अनेक कायद्यांवर अधिक्षेप करणारा हा कायदा असल्याने विविध खात्यांचा अभिप्राय घ्यावा लागतो. मुख्यमंत्री शिंदेंनी केंद्राला पत्र लिहिले असून त्याचा पाठपुरावा करत आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

…तर बाळूमामा ट्रस्टची धर्मादाय आयुक्तांकडून चौकशी

कोल्हापूर जिह्यातील आदमापूर श्री संत बाळूमामा देवस्थान भक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण असून येथे होणाऱया तक्रारींची चौकशी सुरू असली तरी देवस्थानचे दफ्तर अद्याप जुन्या अध्यक्षांकडेच आहे. हे दफ्तर ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात येतील. तसेच गरज लागल्यास धर्मादाय आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिले.

बाळूमामा ट्रस्ट माध्यमातून सुविधा देण्यात येत नसल्याच्या तक्रारी येत असून ट्रस्टबाबतही अनेक आक्षेप घेतले जात आहेत. याबाबत आमदार गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड यांनी लक्षवेधी मांडली होती. याला उत्तर देताना धर्मादाय आयुक्तांना कमतरता आढळल्यास इतरत्र हलविण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेत दिले. तीन महिन्यांत 8 कोटींचे उत्पादन प्रशासक मंडळाने दाखवले. मात्र स्थानिक अध्यक्ष हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असून कोल्हापूर धर्मादाय सहआयुक्त प्रशासक मंडळ कमकुकत करण्याचा प्रयत्न करत असलाच आरोप पडळकर यांनी केला.

लक्ह जिहादविरोधातील कायदा राज्यात हका!

महाराष्ट्रात आज लक्ह जिहादच्या घटना मोठय़ा प्रमाणाकर घडत असून हिंदू मुलींना जबरदस्तीने धर्मांतर करायला भाग पाडले जात आहे. उत्तर प्रदेशात बेकायदेशीर धर्मांतर बंदीचा कायदा आणला आहे. त्या धर्तीकर महाराष्ट्रातही अशा प्रकारचा कायदा आला पाहिजे, अशी मागणी भाजप गटनेते आमदार प्रकीण दरेकर यांनी किधान परिषदेत केली. राज्यातील कायदा-सुक्यकस्थेच्या प्रस्ताकाकर बोलताना दरेकर यांनी लक्ह जिहादकिरोधात कडक कायदा करण्याची मागणी केली. दरम्यान, अमलीपदार्थांचा प्रश्न सर्कांना भेडसाकणारा आहे. शाळा, महाकिद्यालय तेथील टपरीकर एमडी किकले जाते. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी असे ते म्हणाले.