राहुरी येथे मराठा एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले चक्काजाम आंदोलन

राहुरी येथे मंगळवार दि.5 सप्टेंबर रोजी अंतरवली (जि.जालना) येथे मराठा आंदोलकांवर पोलीस प्रशासनाने लाठी हल्ला केला त्याच्या निषेधार्त कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नगर मनमाड रस्त्यावर मराठा एकीकरण समितीच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी,मुस्लीम समाज,जय भीम मित्रमंडळ,संभाजी ब्रिगेडसह सर्वच राजकीय पक्षांनी उपस्थित रहात पाठींबा दिला.
या प्रसंगी मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे म्हणाले कि गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षण या विषयास धरून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची अनेक आंदोलने झाली आहेत.मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघून देखील पोलिस प्रशासनास कधी काढी घेवून येण्याची गरज पडली नाही.परंतु अंतरवली जि.जालना येथे अचानक लाठी हल्ला करण्यात आला या सर्व घटनेवरून जाणीवपूर्वक मराठा आंदोलन बदनाम करण्याचे काही प्रवृत्ती प्रयत्न करत आहेत असे निदर्शनास येत आहे,अशा प्रवृत्तींना ओळखून प्रशासनाने कारवाई करण्याचे आवाहन लांबे यांनी केले.
या आंदोलनास आ.प्राजक्त तनपुरे म्हणाले कि अंतरवली जि.जालना घटनेची जबाबदारी घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा.सत्तेचा गैरवापर करून मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठी हल्ला करणे हि अतिशय निंदनीय बाब आहे.सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे म्हणाले कि,सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.शेतकरी,सर्वसामान्य जनता,मराठा समाजाला वेठीस धरले जात आहे.
या प्रसंगी सचिन म्हसे,मच्छिंद्र गुंड, बाळासाहेब जाधव,बाळासाहेब आढाव,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी मराठा एकीकरण समितीचे राजेंद्र लबडे,सतीष घुले,महेंद्र उगले,महेंद्र शेळके,अनिल आढाव,अशोक तनपुरे,रोहित नालकर,प्रशांत खळेकर अविनाश क्षिरसागर,बलराज पाटील,राजेंद्र खोजे,सुनिल निमसे,ज्ञानेश्वर टेकाळे,संभाजी निमसे,विनायक बाठे,अनिल चत्तर,ञानेश्वर सप्रे,बाप्पुसाहेब काळे,अनिरुद्ध मोरे,सुनिल तनपुरे,दिनेश वराळे,जयसिंग घाडगे,दत्तात्रय अडसुरे,गणेश वराळे आदी उपस्थित होते. आंदोलनाचे निवेदन तहसिलदार चंद्रजित राजपूत यांना देण्यात आले.पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
मराठा एकीकरण समितीने आंदोलना दरम्यान जास्त वेळ रास्ता रोको करून सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस न धरता प्रातिनिधिक स्वरुपात 15 मिनिटात रस्ता मोकळा करून दिला व राहुरी शहरातील व्यापारी पेठ बंद न करण्याची भूमिका घेत सामाजिक भान ठेवल्यामुळे सर्व स्तरातून मराठा एकीकरण समितीचे कौतुक केले जात आहे.