पिकवणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांची गर्दी, कृषी प्रदर्शनाकडे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने फिरवली पाठ

प्रसाद नायगावकर, यवतमाळ

कृषी मालाचे योग्य उत्पादन मिळावे, शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे, शेती अवजारे, हरितगृह, बायोटेक्नॉलॉजी, फलोत्पादन, रेशीम उद्योग या सर्वांची माहिती एकच ठिकाणी आणि एकाच छताखाली मिळावी यासाठी जिल्हा पातळीवर कृषी महोत्सवाचे आयोजन केले जाते. यवतमाळमध्ये एका कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मात्र याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली दिसली. पावसाच्या लहरीपणामुळे महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आहे. संकटात सापडलेल्या या शेतकऱ्याने कृषी प्रदर्शनाकडे पाठ फिरवल्याने कृषी विभागात शुकशुकाट होता. या प्रदर्शनाला येणारी लोकं ही बहुतांश इथले खाद्य पदार्थ खाण्यासाठी आल्याचे चित्र दिसत होते.

शेतकरी ,शेतकरी बचत गट ,शेतकरी बचत गट ,शेतकरी उत्पादक कंपनी महिला बचतगट यांनी उत्पादित केलेला शेतमाल ,प्रक्रियायुक्त पदार्थ ,विविध प्रकारच्या डाळी ,सेंद्रिय शेतमाल आदींचे अनेक स्टॉल उलपब्ध करून देण्यात आले होते, मात्र शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवली. या प्रदर्शनात जास्त गर्दी ही खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर दिसून येत आहे. बचतगटांनी खाद्य पदार्थांची शंभराहून अधिक स्टॉल्स लावले आहेत. मटण , चिकन , मांडे ,रोडगे , वांग्याची रस्सा भाजी, पुरणपोळी ,कांद्याचे भजे याची प्रदर्शनात जास्त विक्री होत आहे.