भाजपचे सरकार आल्यास मुस्लिमांचे आरक्षण बंद करू, तेलंगणातील सभेत अमित शहा यांचे विधान 

तेलंगणात मुस्लिम नेते ओवेसी यांच्या दबावात येऊन मागासवर्गीय, ओबीसी आणि एसटीचे आरक्षण काढून ते मुस्लिम समाजाला देण्याचे काम करण्यात आले आहे. जर तेलंगणात भाजपचे सरकार आल्यास आम्ही मुस्लिमांचे आरक्षण बंद करून ते मागासांना देऊ, असे विधान पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केले. ते तेलंगणाच्या वारंगल येथील सभेत बोलत होते.

 

तेलंगणात भाजप सत्तेत आल्यास तेलंगणातील जनतेला अयोध्येत राम मंदिराचे दर्शन मोफत करून देऊ. तेलंगणात भाजप मागासवर्गीयांपैकी एका नेत्याला मुख्यमंत्रीपदी बसवेल, अशी घोषणाही अमित शहा यांनी केली. भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष मागासवर्गीय विरोधी आहेत. केवळ भाजपच मागासवर्गीयांचे कल्याण करू शकते. केसीआर खोटे आश्वासन देतात. बीआरएसला व्हीआरएस देण्याची वेळ आली आहे, असेही शहा यावेळी म्हणाले. केसीआर दोन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. आता त्यांना केटीआरला मुख्यमंत्री करायचे आहे. जर आम्ही तेलंगणात सत्तेत आलो तर येथील 2.5 लाख तरुणांना सरकारी नोकऱया देऊ. बीआरएस, एमआयएम आणि काँग्रेस हे पक्ष 2जी, 3जी आणि 4जी पक्ष आहेत, अशी टीकाही अमित शहा यांनी केली.