अनमोल बिष्णोईविरोधात एलओसी जारी

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी गँगस्टर अनमोल बिष्णोईविरोधात एलओसी (लूक आउट सर्क्युलर) जारी केले आहे. अनमोलविरोधात एलओसी जरी करण्यासाठी पोलिसांनी पेंद्रीय गृह विभागाला विनंती केली होती. या प्रकरणी साबरमती तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचीदेखील कोठडी घेण्याची शक्यता आहे.

अभिनेता सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यावर गँगस्टर अनमोल बिष्णोईने एक फेसबुक पोस्ट अपलोड केली होती. जेथून पोस्ट अपलोड केली होती, त्याचा आयपी अॅड्रेस हा पॅनडाचा असल्याचे समोर आले. सलमान गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. तपासा दरम्यान पोलिसांना अनमोलचे नाव समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी अनमोलच्या विरोधात एलओसी जारी करावी यासाठी पेंद्रीय गृह विभागाला विनंती केली होती. ती विनंती गृह विभागाने मान्य केल्यानंतर अखेर अनमोलविरोधात एलओसी जारी करण्यात आली आहे. दरम्यान, लॉरेन्स बिष्णोईचीदेखील कोठडी घेऊन त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.

गोळीबार प्रकरणी पोलिसांनी विकी गुप्ता आणि सागर पालला भुज येथून अटक केली होती. ते दोघे भुज येथे गेले. तेथे त्याने तापी नदीत जिवंत काडतुसे टाकली होती. नुकतीच ती काडतुसे पोलिसांनी जप्त केली. सागर आणि विकीच्या चौकशीत पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. मार्च महिन्यात सागर आणि विकी हे पनवेल येथे आले. त्यानंतर त्या दोघांना सोनू कुमार बिष्णोई आणि अनुजकुमार थापनने शस्त्र पुरवली. सागर आणि विकीच्या चौकशीत पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. युनिट-9चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक, युनिट-10चे प्रभारी निरीक्षक दीपक सावंत, युनिट-8चे प्रभारी निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे आदींचे पथक पंजाबच्या अबाहोर गावात फिल्डिंग लावून सोनू आणि अनुजला पोलिसांनी ताब्यात घेतले.

दोघांना मिळाले 35 हजार 

सोनू हा किराणा दुकानात तर अनुज हा क्लिनर म्हणून काम करतो. अनुज हा गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. ते मार्च महिन्यात ट्रेनने पंजाब येथून पनवेल येथे आले. तेथे शस्त्र देऊन ते पुन्हा पंजाब येथे गेले. त्या दोघांना 35 हजार रुपये मिळाले होते. 35 हजारातून त्याने काही पैशांत नशा केली. उरलेले पैसे त्या दोघांनी वाटून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.