शिंकला म्हणून मुलाच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून आग लावली

शिंक अंगावर पडल्याने अल्पवयीन मुलाने दुसऱया अल्पवयीन मुलाच्या चेहऱयावर सॅनिटायझर टाकून आग लावल्याची घटना अंधेरी परिसरात घडली आहे. याप्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा नोंदविला आहे. त्या मुलाची रवानगी बालगृहात केली आहे. या घटनेत मुलाचा चेहरा आणि कानावरचा भाग जळाला आहे. मुलाला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा नोंद केला.