बेन स्टोक्स गेला रे… फिटनेससाठी टी-20 वर्ल्ड कपमधून माघार

इंग्लंडचा कसोटी कर्णधार असलेल्या बेन स्टोक्सला वन डे वर्ल्ड कपसाठी निवृत्ती मागे घेण्यास भाग पडले होते. मात्र वर्ल्ड कपमध्ये बेन स्टोक्स आणि जगज्जेत्यांच्या निराशाजनक कामगिरीने टोक गाठले होते. त्यामुळे तो टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची शक्यता कमीच होती. अखेर फिटनेसचे कारण देत बेन स्टोक्सने टी-20 वर्ल्ड कपमधून माघार घेण्याचा आपला निर्णय जाहीर केला. एकीकडे टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत जोरदार तयारी सुरू असताना स्टोक्सच्या माघारीमुळे ईसीबीला मोठा मानसिक धक्का बसला आहे.