प्रेमीयुगुलाच्या नात्यात आला दुरावा, प्रेयसीच्या नातेवाईकांनी प्रियकराचे ओठ कापले

प्रातिनिधीक फोटो

पश्चिम बंगालमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. प्रेमीयुगुलामध्ये वाद झाल्यानंतर प्रेयसीच्या घरच्यांनी प्रियकराला घरी बोलावून त्याचे धारदार शस्त्राने ओठ कापल्याची घटना घडली आहे. जखमी युवकाला बोलपूर रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोमिनुल इस्लाम असे त्या तरुणाचे नाव असून जिल्ह्यातील बोलपूर परिसरातील काशीपुर गांवातील रहिवासी आहे. त्याच गावात राहणारे बोजो खान यांच्या मुलीसोबत तिचे प्रेमसंबंध होते, त्यांच्या नात्याला 5 वर्ष नात्यात होती. मोमिनुल इस्लाम कुटुंबियांच्या आरोपावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आला होता. त्यानंतर प्रेयसीच्या नातेवाईकांनी त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी मुलीच्या प्रियकराला घरी बोलावले. मोमिनुल इस्लाम याला घरी बोलावल्यानंतर दोघांमध्ये सलोखा करण्याचा प्रयत्न केला, मात्र काही कारणास्तव दोन्ही पक्षांमध्ये वाद वाढला. आरोप-प्रत्यारोपानंतर हा वाद अजूनच वाढला. वाद वाढल्यानंतर रागाच्या भरात प्रेयसीच्या कुटुंबियांनी प्रियकराचे धारदार हत्याराने ओठ कापले. ओठ कापताच तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

तशाच अवस्थेत तो प्रेयसीच्या घरुन निघाला आणि स्वत:च्या घरी पोहोचला. त्याची ही अवस्था पाहून घरचे हादरुन गेले. त्याला तत्काळ बोलपूर रूग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोमिनुल इस्लामला बोलपूर उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी ही घटना घडली, मात्र शुक्रवारी नातेवाईकांनी वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप करत आंदोलन केले. प्रियकराच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक लोकांनी विरोध केला. त्याच्यावर योग्य उपचार होत नसल्याची तक्रार तरुणाच्या नातेवाईकांची आहे. बोलपूर उपविभागीय रुग्णालयात आरोग्य सेवेची दुरवस्था असल्याने उपचार दिले जात नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. रुग्णालय प्रशासनाने या घटनेचा तपास सुरू केला आहे.