चंद्रपुरात मुनगंटीवार यांच्या डोकेदुखीत वाढ; भाजप नेत्याच्या नातेवाईकाच्या गाडीतून अवैध दारू वाहतूक

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी संपत असतानाच चंद्रपूर जिल्हा भाजपचे माजी देवराव भोंगळे यांच्या मेहुण्याच्या गाडीतून अवैध दारू वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले आहे. ऐन निवडणुकीत भाजप नेते भोंगाळे यांचा मेहुणा आशीष मोरे याला दारूची अवैध वाहतूक करताना पोलिसांनी पकडल्याने चंद्रपुर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची डोकेदुखी वाढली आहे.

चंद्रपूर जिह्यातील कोठारी येथे पोलिसांनी नाकाबंदी करून वाहन पकडले. महिंद्रा बोलेरो पंपनीच्या या वाहनात सुमारे सात हजार रुपयांचा दारूसाठा लपवून ठेवण्यात आला होता. या वाहनात भाजप नेते देवराव भोंगळे यांचे नातेवाईक आशीष मोरे बसले होते. हे वाहन पोलिसांनी थांबवून तपासणी केली असता त्यात सात हजार रुपयांची विदेशी दारू आढळून आली. यासंदर्भात कोठारी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दारू नेमकी कुठे आणि कुणासाठी पोचवली जात होती, याचा तपास सुरू आहे.

z चंद्रपूरमध्ये दारूबंदी व्हावी यासाठी साठी भाजपचे लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी जीवाचे रान करून ती इथे लागू केली. मात्र त्यांच्याच पक्षातील नेते दारूला समर्थन देताना या घटनेतून दिसून आले. दोन दिवसांपूर्वीच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दारुवरून काँग्रेस उमेदवारावर टीका केली होता. मात्र आता भाजप नेत्याचा नातेवाईकच दारूची वाहतूक करताना आढळल्याने भाजपला नाचक्की सहन करावी लागत आहे.