श्रीनगरमध्ये झेलम नदीत मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली; जिवीतहानीची शक्यता

जम्मू कश्मीरमधील झेलम नदीत मंगळवारी पहाटे लहान मुलांना घेऊन जाणी बोट उलटली आहे. ही बोट गंदरबलहून बटवाराकडे जात होती. बटवारा भागाजवळ आल्यावर ही बोट झेलम नदीत उलटली. त्यात स्थानिकांसह लहाम मुले होती. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.

स्थानिकांनी घटनेची माहिती पोलीस आणि राज्य आपत्तीनिवारण पथकाला दिली आहे. घटनेनंतर एक तास उलटल्यानंतरही या भागात बचाव पथकाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. त्यामुळे या घटनेत मोठ्या प्रमाणात जिवीतहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच बोटीतील अनेक मुले बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. झेलम नदीत जलस्तर वाढल्याने ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.