दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी; एटीएसच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

कोथरूड भागात पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी बॉम्ब तयार करून त्याच्या चाचण्या पुणे, कोल्हापूर, सातारा येथील जंगलांमध्ये केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. तपासादरम्यान या दहशतवाद्यांकडे सापडलेली चकचकीत पावडर स्फोटकच असल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एटीएसकडे वर्ग करण्यात आला असून, सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांनी दोघांना 5 ऑगस्टपर्यंट एटीएस कोठडी सुनावली आहे.

कोथरूड पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान 18 जुलै रोजी मोहम्मद युनूस महंमद साकी ( 24), मोहम्मद इम्रान महंमद खान (23) या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. न्यायालयाने या दोघांना 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने दोघांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी एटीएसने या दोघांकडून जप्त करण्यात आलेल्या एका पेनड्राईव्हच्या विश्लेषणाचा 400 पानांपेक्षा अधिकचा अहवाल न्यायालयात दाखल केला. आरोपींकर दाखल गुह्यात बेकायदेशीर कारकाया प्रतिबंधक कायद्यानुसार कलम काढ करण्यात आली आहे. हे दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलांमध्ये बॉम्बची नेमक्या कोणत्या कारणांसाठी प्रॅक्टीस चाचणी केली, त्यांचा कोणत्या शहरात घातपात करण्याचा कट होता, घातपात करण्यासाठी त्यांनी कोणत्या ठिकाणाची रेकी केली आहे का, याचा सखोल तपास करण्यासाठी तसेच त्यांच्या फरार साथीदाराचा शोध घेण्यासाठी, त्यांना कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली. बचाव पक्षातर्फे ऍड. यशपाल पुरोहित यांनी काम पाहिले. त्यानंतर न्यायालयाने या दोघांना 5 ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावली.

पांढरी पावडर हे स्फोटकच

पोलीस तपासादरम्यान दोन्ही आरोपींच्या घराची झडती घेतली होती. यावेळी इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह पावडर सापडली होती. ती पावडर स्फोटक असल्याचे एक्सप्लोझिक्ह केपर डिटेक्टरमधून स्पष्ट झाले आहे. तसेच पोलिसांच्या डॉग स्कॉडनेदेखील यासंबंधी सकारात्मक अहवाल दिला आहे. हस्तगत करण्यात आलेली पावडर नेमके कोणते स्फोटक आहे, याचा तपास सुरू आहे. पावडर न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविली असून, त्याचा अहवाल अद्यापि आलेला नाही.

इसिसच्या अल सुफाशी कनेक्शन

इसिसशी सलग्न असलेल्या ‘अल सुफा’ या संघटनेशी हे दहशतवादी संबंधित आहेत. या दहशतवाद्यांचे ब्रेन कॉश करण्यात आले होते. घातपातासाठी दहशतवादी विचारधारा स्वीकारण्यापासून प्रशिक्षण आणि त्यानंतर प्रत्यक्षात कारवाई करेपर्यंतच्या सर्व पद्धतीचे दोघांना ट्रेनिंग दिले आहे. त्यांनी रेकी करणे, त्यानंतरचे प्लॅनिंग करून कृती करण्याचे प्रशिक्षण घेतले असल्याचे तपासात उघड झाले आहे.