बावनकुळेंकडून आचारसंहिता भंग, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रारी काँग्रेसच्या वतीने आज मुख्य निवडणूक अधिकाऱयांकडे दाखल करण्यात आली. खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही बावनकुळे यांनी त्या प्रकरणाचा निकाल लागला असल्याचा दावा करून मतदारांची दिशाभूल केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

नवनीत राणा यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. राणा यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना बावनकुळे यांनी त्या प्रकरणाचा निकाल लागला असल्याचा दावा करून न्यायालयाचा अवमान केला. हा गंभीर गुन्हा आहे. असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले. अशा पद्धतीचे विधान जाणीवपूर्वक करुन खोटी माहिती पसरवली जात आहे, हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे.