स्वातंत्र्यदिनी चांद्रयान-3 नं काढला चंद्राचा व्हिडीओ, इस्रोनं केला शेअर

chandrayan took video and image

हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) चांद्रयान-3 या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. 15 ऑगस्ट रोजी, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यदिनी अवकाशयानाने लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा (LPDC) वापरून चंद्राच्या आकर्षक प्रतिमा घेतल्या.

इस्रोच्या चंद्र संशोधनातील महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून हा व्हिडीओ शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला.

14 जुलै 2023 रोजी हिंदुस्थानातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलेलं चांद्रयान-3 नं 5 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. आता डीबूस्टिंग प्रक्रियेमुळे विक्रम लँडर चंद्राच्या जवळ पोहोचलं आहे.