विक्रमने केलं चंद्राच्या पृष्ठभागावर खोदकाम, वाचा बातमी

देशाची महत्त्वाकांक्षी मोहीम असलेली चांद्रयान 3 यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्याने हिंदुस्थानने अंतराळ क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे. आता या यानातील रोव्हरने चंद्रावर भ्रमण करायला सुरुवात केली असून चंद्राच्या रहस्यांचा उलगडा करायला सुरुवात केली आहे. रविवारी विक्रम लँडरने पहिल्यांदाच चंद्रावरच्या दक्षिण ध्रुवावरच्या तापमानाची माहिती पाठवली. आता, विक्रमने चंद्राच्या पृष्ठभागावर खोदकाम केल्याची माहिती मिळत आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावरील थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट (ChaSTE) पेलोड, विक्रम, चांद्रयान 3 लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमानातील बदल समजून घेण्यासाठी दक्षिण ध्रुवाभोवतीच्या चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीच्या तापमानाची माहिती दिली होती.

विक्रमकडून आलेली माहितीवरून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पृष्ठभाग आणि पृष्ठभागापासून चंद्राच्या जमिनीतील खोलात बदल दिसून येत आहे. येथील तापमान उणे 10 अंश सेल्सिअस ते उणे 60 अंश सेल्सिअसदरम्यान आहे, अशी माहिती इस्रोने दिली होते. ChaSTE पेलोडमध्ये पृष्ठभागाखाली 10 सेमी खोलीपर्यंत पोहोचून तापमान तपासणी करण्याची यंत्रणा आहे. चंद्रावर संशोधन करण्यासाठी विक्रमने चंद्राच्या पृष्ठभागावर खोदकाम केलं आहे, अशी माहितीही इस्रोने दिली आहे.