‘चांद्रयान-3’ चंद्राच्या आणखी जवळ

हिंदुस्थानच्या ‘चांद्रयान-3’ या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. हे चांद्रयान मजल दरमजल करत पुढे सरकत असून शनिवारीच या चांद्रयानामुळे चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. आता त्याने आणखी एक कक्षा पार केली आहे.  सध्या हे चांद्रयान चंद्राच्या 174 बाय 1437 या कक्षेत फिरत असून 14 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 ते 12.30 दरम्यान  आणखी एक टप्पा पार करेल आणि आपली कक्षा बदलेल. तब्बल 22 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान 5 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता चंद्राच्या कक्षेत पोहोचले. दरम्यान, चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर या यानाने ऑनबोर्ड कॅमेऱयाच्या माध्यमातून चंद्राची काही विलोभनीय छायाचित्रे घेतली होती. ‘इस्रो’ने त्याचा एक व्हिडीओ आपल्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध केला होता.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)