चांद्रयान अखेरच्या टप्प्यात, बुधवारी पावणेसहाला चंद्रावर उतरणार

चांद्रयान-3 ने आज एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. ‘इस्रो’ने गुरुवारी दुपारी 1.15 वाजता चांद्रयान-3 च्या प्रोपल्शन मॉडय़ुलला लँडर आणि रोवरपासून वेगळे केले. आता प्रोपल्शन मॉडय़ुल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीकडून येणाऱया रेडिएशनचा अभ्यास करेल, तर लँडर व रोवर 23 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे. या ठिकाणी 14 दिवस पाण्याच्या शोधासह अन्य प्रयोग करेल.