Deepfake- 37 वर्षीय अभिनेत्रीचे नग्न फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून मॉर्फ केलेल फोटो प्रसारित झाल्याच्या अनेक घटना मागील काही दिवसांमध्ये देशात घडल्या आहेत. अशीच एक घटना मुंबईमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिम येथे वास्तव्याला असणाऱ्या एका 37 वर्षीय अभिनेत्रीचे नग्न फोटो व्हायरल करण्यात आले आहेत. अभिनेत्रीच्या मित्राला सर्वप्रथम तिचे नग्न फोटो पाठवण्यात आले. त्यानंतर त्याने अभिनेत्रीला याची कल्पना दिली. पीडितेच्या मित्राला कुलदीप द्विदेशी नावाच्या फेसबुक अकाउंटवरुन फोटो पाठवण्यात आले होते. कामाच्या गडबडीत पीडितेने गुन्हा दाखल केला नव्हता.

पण, जेव्हा पंजाबमध्ये राहणाऱ्या पीडितेच्या आईला आणि वडिलांना न्यूड फोटो पाठवण्यात आले. तसेच तिच्या काही मित्रमैत्रिणींना सुद्धा अनोळखी नंबरवरून पीडितेचे न्यूड फोटो पाठवण्यात आले होते. त्यानंतर 7 जानेवारी रोजी पीडितेने ऑनलाईन तक्रार दाखल केली. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील पिरंगुट येथे राहणाऱ्या मित्रावर पीडितेचा संशय आहे आणि तिने त्याचा मोबाईल नंबर पोलिसांना तपासासाठी दिला.

पीडितेने भारतीय दंड संहितेच्या कलम 506, कलम 67 आणि कलम 67 (अ) (लैंगिक सामग्रीचे प्रसारण) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.