ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात

ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला पुणे पोलिसांनी मंगळवारी मुंबई पोलिसांच्या ताब्यातून वर्ग करून घेतले आहे. गुन्हे शाखेचे पथक रात्री उशिरा ललितला घेऊन पोलीस आयुक्तालयात दाखल झाले होते. बुधवारी त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

अमली पदार्थ विक्री, ससून रुग्णालयातून पसार झाल्या प्रकरणी ललित पाटील याच्याविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल आहेत. ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर त्याला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली होती. ललितला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी सोमवारी न्यायालयात अर्ज सादर केला होता.