‘या’ दिवशी होऊ शकते लोकसभा निवडणूकीची घोषणा… जाणून घ्या सविस्तर

देशभरात सध्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. सर्व राज्यांमध्ये प्रचार सभा धडाक्यात होऊ लागल्या आहेत. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. दरम्यान 13 मार्च रोजी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणूका जाहीर करू शकते.

निवडणूक आयोग पुढच्या महिन्यात जम्मू कश्मीरचा दौरा करणार आहे. या दौऱ्यानंतर निवडणूक आयोग निवडणूक आयोग लोकसभा निवडणूक आयोग निवडणूकीच्या तारखा जाहीर करणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणूक यंदा सात त आठ टप्प्यात होऊ शकते असेही समजते.

सात टप्प्यात झालेली 2019 ची निवडणूक

2019 ची लोकसभा निवडणुक ही सात टप्प्यात पार पडली होती. 10 मार्च रोजी निवडणूक आयोगाने निवडणूकीची घोषणा केली होती. त्यानंतर बरोबर महिनाभराने निवडणूकांना सुरुवात झालेली. 2019 ला 11 एप्रिल ते 19 मे 2019 दरम्यान निवडणूक पार पडली होती. तर 23 मार्च रोजी निकाल जाहीर झाला होता.