बाईपण एकदम भारी, त्रिंगलवाडी किल्ल्यावर अनोखे मैत्री दिन सेलिब्रेशन

मित्र म्हणजे निखळ, कोणताही आडपडदा नसलेले नाते. रविवारी 6 ऑगस्ट रोजी जगभरात मैत्री दिन साजरा झाला. आपल्या जिवलग मित्र-मैत्रिणींना भेटून, त्यांना शुभेच्छा देऊन या खास दिवसाचे सेलिब्रेशन करण्यात आले. गडकोट ट्रेकर्सच्या काही मैत्रिणींनी खास मोहीम आखून हा संस्मरणीय केला. त्यांनी त्रिंगलवाडी किल्ला सर केला.

त्रिंगलवाडी किल्ला नाशिक जिह्यामधील इगतपुरी तालुक्यात आहे. किल्ल्याची समुद्रसपाटापासूनची उंची 3238 फूट इतकी आहे. गडावर खूप सुसाट वारा, दाट धुके आणि सतत कोसळणारा पाऊस होता. साक्षी आंबेकर, अभिज्ञा मोरे, प्रिया वेलनेकर, कल्पना गायकवाड, चित्रा गंधारे, काजल तुपे, ईशा गंधारे यांनी गावातील एक गाइडसोबत ट्रेक यशस्वी केला. त्यांनी त्रिंगलवाडी किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूत ‘जय शिवराय’च्या घोषणा दिल्या. तसेच आपल्या चांद्रयानाने काल चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. त्याबद्दल महिला ट्रेकर्सनी ‘विजयी भव’ची सलामी दिली.