निर्यात शुल्कात 40 टक्के वाढ, कांदय़ावरून मोदी सरकारने केला राज्यातल्या बळीराजाचा वांधा

राज्यात कांदय़ाचा प्रश्न सध्या पेटला आहेकांदय़ाला गेल्या काही दिवसांत चांगला भाव मिळत असल्याने शेतकरीवर्ग आनंदात होतापण केंद्रातील शेतकरीविरोधी सरकारने कांदय़ाच्या निर्यात शुल्कात चाळीस टक्के वाढ केली आहेत्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळय़ात कांदय़ामुळे पाणी तरळले आहेया निर्णयाच्या विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहेराज्यात अनेक ठिकाणी याविरोधात आंदोलन पुकारण्यात आले.

उन्हाळी कांदय़ाला 300 ते 400 रुपये भाव मिळालात्यावेळी उत्पादन खर्चही निघाला नाहीत्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडीने सरकारला धारेवर धरल्यानंतर शिंदे सरकारने 350 रुपये अनुदान जाहीर केलेपण तेही अजून मिळाले नाहीशेतकऱ्याला हे अनुदान मिळू नये म्हणून जाचक अटी घातल्याआता कांदय़ाला 2000 ते 2500 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत होतासणासुदीच्या दिवसात शेतकऱ्याला चार पैसे मिळत होतेपण शेतकरीविरोधी मोदी सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्कवाढ करताच कांदय़ाचे दर कोसळून 1 हजार 600 रुपयांच्या खाली आल्याचे चित्र आहे.

या मुद्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतलाकिरकोळ बाजारात कांदय़ाचे दर आटोक्यात राहावेत म्हणून हा निर्णय घेतल्याचा भाजप सरकारचा दावा आहेमहागाई कमी करून जनतेला दिलासा द्यायची मोदी सरकारची प्रामाणिक इच्छा असती तर एलपीजीगॅस सिलिंडरपेट्रोलडिझेल व अन्नधान्यांसह बाजारातील इतर जीवनाश्यक वस्तूंची महागाई कमी करण्यासाठी असे पाऊल काही उचलत नाहीहा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रकार आहेमूठभर भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या मोदी सरकारच्या काळात देशातील शेतकरी देशोधडीला लागला आहेअशी टीका नाना पटोले यांनी केली.

रस्त्यावर उतरून जाब विचारणार

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यात शुल्कवाढीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन सुरू केले आहेशेतकऱ्यांची मागणी रास्त असून काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेवेळ पडली तर याप्रश्नी काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारण्यास मागेपुढे पाहणार नाहीअसेही नाना पटोले म्हणाले.

आज बैठक

दरम्याननाशिक परिसरात कांदा उत्पादक व्यापाऱ्यांनी बंद सुरू केला आहेउद्या (मंगळवारीया प्रश्नावर तहसीलदारांसोबत बैठक असल्याचे सांगण्यात येते