
मंचर शहरातील पुणे-नाशिक महामार्गावर मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी घोषणा देण्यात आल्या.
भिमाशंकर सहकारी साखर कारखाना येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर हे उपोषण आंदोलन करत आहे. त्यांना यावेळी समर्थन देण्यात आले. ऊसाला टनामागे 3400 हमीभाव मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
‘भिक नको, हवा घामाचा दाम’ अशा घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे-नाशिक महामार्गावर मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर ठाण मांडून रास्ता रोको केले. यावेळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यानंतर आंदोलन करते प्रभाकर बांगर यांना समर्थन देण्यासाठी भीमाशंकर कारखाना येथे रवाना झाले.